International Plastic Bag Free Day 2024: का साजरा केला जातो प्लास्टिक बॅग फ्री डे? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Plastic Bag Free Day 2024: का साजरा केला जातो प्लास्टिक बॅग फ्री डे? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

International Plastic Bag Free Day 2024: का साजरा केला जातो प्लास्टिक बॅग फ्री डे? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Jul 03, 2024 10:02 AM IST

International Plastic Bag Free Day Celebration: दरवर्षी ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि कसा साजरा करावा हे जाणून घ्या.

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन ( unsplash)

International Plastic Bag Free Day History and Significance: सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील व्यक्ती, समुदाय आणि व्यवसायिकांना कृती करण्यासाठी आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी आठवण करून देतो. प्लास्टिक पिशव्या प्रदूषणास कारणीभूत ठरतात, वन्यजीवांचे नुकसान करतात. या पिशव्या विघटित होण्यास शेकडो वर्षे लागतात, ज्यामुळे इको सिस्टिमचे दीर्घकालीन नुकसान होते.

या दिवशी पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्यासारखे प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी विविध उपक्रम आणि मोहिमा आयोजित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी अधिक शाश्वत भविष्यास चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देते. खरेदी करताना किंवा वस्तू नेताना सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या नाकारणे आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडण्याची ही एक संधी आहे.

इतिहास

सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने बॅग फ्री वर्ल्ड या जागतिक चळवळीने हा उपक्रम सुरू केला होता. प्लॅस्टिक पिशव्यांच्या पर्यावरणीय परिणामांविषयी चिंता असलेल्या काही संस्था आणि व्यक्तींनी २००८ मध्ये ही मोहीम सुरू केली होती.

 

महत्त्व

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट सामूहिक जाणीव निर्माण करणे आणि व्यक्ती, समुदाय आणि व्यवसायांना प्लास्टिक पिशव्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणासाठी कार्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. हा दिवस प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची आठवण करून देतो. प्लास्टिक कचरा कमी करणे, शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन देणे आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासंदर्भात वागणूक यातील बदलांना प्रोत्साहन देणे याविषयी जनजागृती केली जाते.

सेलिब्रेशन

जगभरात विविध अॅक्टिव्हिटी आणि उपक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन साजरा केला जातो. संस्था, पर्यावरणवादी ग्रुप आणि व्यक्ती प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्यांसारख्या पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम, कार्यशाळा आणि जागरूकता मोहिमा आयोजित करतात.

कम्युनिटी, शहरे आणि अगदी संपूर्ण देश या दिवशी प्लास्टिक पिशव्या बंदी किंवा नियमांमध्ये भाग घेऊ शकतात. सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर मर्यादित ठेवण्याची धोरणे अंमलात आणू शकतात. स्वयंसेवी गट आणि पर्यावरणवादी संस्था बऱ्याचदा समुद्रकिनारे, उद्याने आणि इतर नैसर्गिक भागातून प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता मोहीम आयोजित करतात. तर व्यवसाय आणि किरकोळ विक्रेते खरेदी करताना पुन्हा वापरण्यायोग्य पिशव्या आणणाऱ्या ग्राहकांना सवलत किंवा प्रोत्साहन देऊन शाश्वत पर्यायांच्या वापरास प्रोत्साहित करतात.

शाळा, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था या दिवसाचा उपयोग प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणीय परिणाम आणि प्लास्टिक कचरा कमी करण्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना शिक्षित करतात.

Whats_app_banner