मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Sep 21, 2022 12:56 PM IST

International Peace Day 2022 : जगभर आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा का केला जातो आणि या दिवसाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस

History and Significance of International Peace Day : दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन ( world peace day) म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्व देश आणि लोकांमध्ये शांततेच्या आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९८१ मध्ये या दिवसाची सुरुवात केली. यानंतर १९८२ मध्ये सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. १९८२ ते २००१ पर्यंत आंतरराष्ट्रीय शांतता दिवस सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जात होता. दोन दशकांनंतर २००१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने एकमताने हा दिवस अहिंसा आणि युद्धविराम दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. प्रथमच हा दिवस १९८२ मध्ये अनेक राष्ट्रे, राजकीय गट, लष्करी गट आणि लोकांद्वारे साजरा करण्यात आला. २०१३ मध्ये यूएन सरचिटणीसांनी ते शांतता शिक्षणासाठी समर्पित केले.

या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात (न्यूयॉर्क) संयुक्त राष्ट्रांच्या शांततेची घंटा वाजवून होते. ही घंटा आफ्रिका वगळता सर्व खंडांतील मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून बनवली आहे, जे जपानच्या युनायटेड नॅशनल असोसिएशनने भेट दिले होते. ही घंटा युद्धातील माणसाच्या मोलाची आठवण करून देणारी आहे. जगात सदैव शांतता असावी असे त्याच्या बाजूला लिहिले आहे.

या वर्षीची थीम (International Day Of Peace Theme)

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी थीम जारी केली आहे. या वर्षीची थीम आहे "वंशवाद संपवा. शांतता निर्माण करा." ( End racism. Build peace) म्हणजेच जातिवाद दूर करा, शांततेला प्रोत्साहन द्या. युनायटेड नेशन्सचा असा विश्वास आहे की खऱ्या शांततेचा अर्थ केवळ हिंसाचाराचा अभाव नाही तर अशा समाजाची निर्मिती देखील आहे, जिथे सर्व लोकांना असे वाटते की ते भरभराट आणि प्रगती करु शकतात. एक असे जग निर्माण करणे जिथे प्रत्येकाला त्यांची जात विचार न करता समान वागणूक दिली जाईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग