मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Panic Day 2024: पॅनिक अटॅक पासून त्वरित आराम देतील हे सोपे उपाय! लगेच होईल फायदा

International Panic Day 2024: पॅनिक अटॅक पासून त्वरित आराम देतील हे सोपे उपाय! लगेच होईल फायदा

Jun 18, 2024 10:12 AM IST

International Panic Day 2024: पॅनिक अटॅक ही अशी स्थिती आहे ज्यामुळे इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या समस्येने ग्रस्त व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणे, हात-पाय थरथरणे आणि खूप गुदमरल्यासारखे वाटू शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या.

पॅनिक अटॅकपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय
पॅनिक अटॅकपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय (unsplash)

Easy Ways to Calm Anxiety and Panic Attack: आज जगभरात आंतरराष्ट्रीय पॅनिक डे साजरा केला जात आहे. पॅनिक अटॅकमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची लोकांना जाणीव व्हावी या उद्देशाने दरवर्षी १८ जून रोजी हा खास दिवस साजरा केला जातो. अभ्यासानुसार, शहरांमध्ये राहणाऱ्या ३० टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी पॅनिक अटॅकचा सामना करावा लागतो. पॅनीक अटॅक ही अशी स्थिती आहे ज्यामुळे इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या समस्येने ग्रस्त व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणे, हात-पाय थरथरणे आणि खूप गुदमरल्यासारखे वाटू शकते, असे काही लक्षणे दिसतात. पॅनिक अटॅक पासून त्वरीत आराम हवा असेल तर काही सोपे उपाय करता येतात. कोणते ते पाहा.

चिंता आणि पॅनिक अटॅकमध्ये असतो फरक

लोक बऱ्याचदा चिंता आणि पॅनिक अटॅक हे समान गोष्ट म्हणून समजतात. परंतु चिंता आणि पॅनिक अटॅक हे ऐकण्यात खूप समान वाटू शकते, पण या दोन समस्यांमध्ये बराच फरक आहे. चिंता हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे, तर पॅनीक अटॅक कधी कधी काही भीतीमुळे उद्भवतात. मात्र या दोन्ही गोष्टी शरीरासाठी घातक आहेत. पॅनीक अटॅक कोठेही, केव्हाही होऊ शकतो. परंतु हे बऱ्याचदा पॅनीक डिसऑर्डर किंवा चिंता विकार असलेल्या लोकांमध्ये उद्भवते. ही समस्या टाळण्यासाठी त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पॅनिक अटॅक टाळण्यासाठी फॉलो करा हे उपाय

पॅनिक अटॅक आल्यावर आंबट खा

चिंता आणि पॅनिक अटॅक आल्यावर स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी आंबट पदार्थ खाऊ शकता. तणावाच्या काळात किंवा चिंताग्रस्त असताना लिंबासारख्या आंबट पदार्थाचे सेवन केल्यास लिंबाच्या आंबट चवीकडे तुमचे लक्ष आकर्षित होऊ लागते. जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही कोणतीही कँडी देखील खाऊ शकता.

व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला बरे वाटू शकते. दररोज केलेल्या व्यायामामुळे चिंता वाटण्याची शक्यता कमी होते. चिंता आणि पॅनिक अटॅकपासून दूर राहण्यासाठी व्यक्तीने आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस ४५ मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर दररोज १० मिनिटांचा वॉक तुमच्यासाठी जादू करू शकतो.

निसर्गासोबत वेळ घालवा

हल्लीच्या काळात व्यक्तीचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया आणि स्क्रीनसमोर बसून जातो. जे तणाव निर्माण होण्याचं मोठं कारण आहे. अशावेळी निसर्गासोबत थोडा वेळ घालवल्यास तुमचे मन शांत होते आणि टेन्शन आणि पॅनिक अटॅकची शक्यता कमी होते. यासाठी घराच्या बाल्कनीतील रोपांची काळजी घेऊन किंवा फिरायला जाऊन तुम्ही तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करू शकता. असे केल्याने रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी, हृदयगती आणि तणाव हार्मोन कमी होण्यास मदत होईल.

मेडिटेशन

नियमित मेडिटेशन किंवा ध्यान केल्याने चिंता कमी होण्यास मदत होते. हे आपल्याला आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. खरं तर दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने शरीराबरोबरच मनही थकून जातं आणि त्याची ऊर्जा संपते. अशा वेळी मेंदूला ऊर्जा देण्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे.

दीर्घ श्वास घ्या

जेव्हा तुम्हाला अचानक अस्वस्थ किंवा चक्कर येऊ लागते तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेण्यास सुरवात करता. नाकातून जलद श्वास घ्या. त्यानंतर श्वास थोडा रोखून पुन्हा दीर्घ श्वास घ्या. तोंडातूनही ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करा. काही काळ तोंडातून श्वासोच्छवास थांबल्यानंतर पुन्हा तोंडात ऑक्सिजन भरावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel