International Mother Language Day 2024: भाषा हा संवादाचा पाया आहे. प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी एकमेकांच्या भाषेचा आदर करणे, तिचा स्वीकार करणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे. हे जग भाषा, संस्कृती आणि परंपरांनी भरलेले आहे. बोलीभाषेतही प्रत्येक भाषा वेगवेगळी असते. दर काही किलोमीटरने बोलीभाषा बदलतात आणि भाषा बदलू लागते. हे थोडे कंफ्यूजिंग वाटत असले तरी जगातील विविधतेचे सौंदर्य आणि एकमेकांशी सहकार्य आणि कनेक्ट होण्याचे मार्ग शोधणे हे महत्त्वाचे आहे. देशभरात बोलल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या बोलीभाषांमुळे भारत जगासाठी भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची चळवळ भारतात सुरू झाली नाही तर ती बांगलादेशात सुरू झाली. हा खास दिनानिमित्त जाणून घ्या काही गोष्टी.
२१ फेब्रुवारी १९५२ रोजी बांगलादेशात बंगालीला राजभाषा बनवण्याची चळवळ सुरू करताना चार विद्यार्थी मारले गेले. नोव्हेंबर १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) सर्वसाधारण परिषदेने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस घोषित केला, ज्याचे नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्वागत केले.
दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळी थीम ठरवली जाते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम आहे - बहुभाषिक शिक्षण - शिक्षण आणि आंतरपिढी शिक्षणाचा आधारस्तंभ. (Multilingual education is a pillar of learning and intergenerational learning)
बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज आपल्या भाषांच्या संवर्धनातून समृद्ध होतात. हे पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक वारशाचे वाहक म्हणून काम करतात. मात्र अधिक भाषा लोप पावत असल्याने भाषिक विविधतेला धोक्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या जागतिक लोकसंख्येच्या ४०% लोकांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळत नाही. हे प्रमाण काही प्रदेशांमध्ये ९०% पेक्षा जास्त आहे. शिक्षणात विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा वापर करणे, शिक्षणाचे चांगले परिणाम, आत्मसन्मान आणि गंभीर विचार करण्याची कौशल्ये वाढविण्याचे फायदे याबाबत संशोधन अधोरेखित करते.
हा दृष्टिकोन आंतरजनीय शिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनास देखील समर्थन देतो," असे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे.