International men's day: पुरुषांचा दिवस बनवा खास, द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा, इथे पाहा सुंदर संदेश
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International men's day: पुरुषांचा दिवस बनवा खास, द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा, इथे पाहा सुंदर संदेश

International men's day: पुरुषांचा दिवस बनवा खास, द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा, इथे पाहा सुंदर संदेश

Nov 19, 2024 11:44 AM IST

Men's Day Wishes Marathi: पुरुषांचा मानसिक विकास, सकारात्मक गुणांची कदर आणि लैंगिक समानता या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

Happy international men's day
Happy international men's day (freepik )

International men's day 2024: आज 19 नोव्हेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जात आहे. समाजातील पुरुषांच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' साजरा केला जातो. कोणत्याही कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. गेल्या काही दशकांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी पुरुषांच्या आरोग्याकडे आणि प्रगतीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पुरुषांचा मानसिक विकास, सकारात्मक गुणांची कदर आणि लैंगिक समानता या उद्देशाने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. आज या खास दिनी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या पुरुषांना हे सुंदर संदेश पाठवून त्यांना ते तुमच्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत याची जणीव करून द्या.

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे.

माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषाला

पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाहेरून 'सुपरमॅन'

पण आतून 'जेंटलमॅन'

असणार्‍या प्रत्येक पुरूषाला

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वेदना सहन करतात, तरीही काहीही बोलत नाहीत

तो माणूस आहे आणि खचून न जाता कठोर परिश्रम करतो.

पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

आम्हाला आधार असणाऱ्या,

आम्हाला उंच उडण्यास मदत करणारे पंख असणाऱ्या

आयुष्यातील बाप, भाऊ, नवरा, मित्र अशा सर्व पुरुषांना

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

पुरुष त्याच्या पैशाने ओळखला जात नाही,

तर त्याच्या चारित्र्याने आणि सचोटीने ओळखला जातो,

सर्व पुरुषांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

"पुरुष हा देवाच्या सर्वात सुंदर

निर्मितींपैकी एक आहे''

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

''या पुरुष दिनानिमित्त

मी तुम्हाला यश, आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतो."

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

''तुमचा दिवस आनंदाने, हास्याने आणि

तुम्ही पात्र असलेल्या कौतुकाने भरला जावो.

याच सदिच्छा''

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

Whats_app_banner