International Men's Day 2023: खास संदेश पाठवून आयुष्यातील 'सुपर मॅन'ला द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Men's Day 2023: खास संदेश पाठवून आयुष्यातील 'सुपर मॅन'ला द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

International Men's Day 2023: खास संदेश पाठवून आयुष्यातील 'सुपर मॅन'ला द्या पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

Nov 19, 2023 11:27 AM IST

Happy International Men's Day 2023 Wishes: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन १९९९ पासून दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो

International Men's Day 2023 Wishes in Marathi
International Men's Day 2023 Wishes in Marathi (Freepik)

International Men’s Day 2023 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन १९९९ पासून दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे वडील, भाऊ, पती, सहकारी इत्यादी समाजातील सर्व पुरुषांच्या कर्तृत्व आणि योगदानाची कदर करणे आणि साजरी करणे. या खास प्रसंगी, तुमचे जीवन आनंदी करणारे, आशा गमावल्यावर तुमच्या पाठीशी उभे राहणारे, तुमचे चांगले मित्र आणि तुम्हाला समजून घेणार्‍या प्रत्येक माणसाचे विशेष आभार मानायलाच हवेत. ते नेहमीच जबाबदारीचे ओझे वाहून नेत असताना आपण त्यांना यासाठी प्रेमळ 'धन्यवाद' दिले पाहिजेत. या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.

बघा शुभेच्छा संदेश

> बाहेरून 'सुपरमॅन'

पण आतून 'जेंटलमॅन'

असणार्‍या प्रत्येक पुरूषाला

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> घराचा खंबीर आधार असणार्‍या

प्रत्येक पुरूषाला

इंटरनॅशनल मेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

> पुरुष म्हणून जन्माला येणे हे नैसर्गिक असते

पुरुष होणे हे वयावर अवलंबून असते

मात्र सत्पुरुष होणे हा प्रत्येकाच्या निवडीवरून ठरते

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> पुरुषांमधील सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे

त्यांच्या मनाशी ओळख झाल्यानंतर

त्यांच्यातील प्रत्येकाकडे असलेला एक विशेष गुण गवसतो

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!!

> चांगल्या पुरुषांवरचा माझा विश्वास कायम ठेवल्याबद्दल आभार

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा!!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

Whats_app_banner