Left Handers Day 2024: डाव्या हाताने लिहिणारे लोक असतात यूनिक, फॅक्ट्स जाणून घेतल्यास तुम्हीही मान्य कराल-international left handers day 2024 here are the amazing facts about left handed people which makes them unique ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Left Handers Day 2024: डाव्या हाताने लिहिणारे लोक असतात यूनिक, फॅक्ट्स जाणून घेतल्यास तुम्हीही मान्य कराल

Left Handers Day 2024: डाव्या हाताने लिहिणारे लोक असतात यूनिक, फॅक्ट्स जाणून घेतल्यास तुम्हीही मान्य कराल

Aug 13, 2024 10:30 AM IST

International Left Handers Day 2024: काही लोक डावखुरे असतात. अशातच आज आंतरराष्ट्रीय डावखुरा दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या डाव्या हाताने लिहिणाऱ्या लोकांना यूनिक बनवणाऱ्या काही गोष्टी.

इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे
इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे (freepik)

Amazing Facts About Left Handed People: अल्बर्ट आईनस्टाईन, बराक ओबामा, नील आर्मस्ट्राँग, बिल गेट्स इत्यादी काही प्रसिद्ध व्यक्तीही डावखुरे आहेत. डाव्या हाताने काम करणारे हे लोक यूनिक मानले जातात. मात्र, अनेक संस्कृती आणि देशांमध्ये डावखुरे असणे अनैसर्गिक मानले जाते. भारतात जसे पूर्वेकडील देश किंवा मध्यपूर्वेत डाव्या हाताने काम करणे असभ्य मानले जाते. अशा वेळी त्यांना उजवा हात वापरायला शिकवले जाते. म्हणूनच दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस साजरा केला जातो. डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांना स्वीकारण्याचा हा एक मार्ग आहे. या खास दिवशी जाणून घ्या डाव्या हाताच्या लोकांना यूनिक बनवणाऱ्या काही गोष्टी.

 

डाव्या हाताने लिहिणारे लोक असतात यूनिक

कमी लोक लेफ्ट हँडर्स असतात

तसं तर बहुतेक लोक सरळ म्हणजे उजव्या हातांनी काम करतात. तथापि लोकसंख्येचा एक मोठा भाग म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या सुमारे १०-१२ टक्के लोक डावखुरे आहेत.

टायपिंगमध्ये फायदा होतो

डावखुऱ्या लोकांना टायपिंगचे फायदे मिळतात. ते त्यांच्या डाव्या हाताचा वापर करून QWERTY कीबोर्डवर ३ हजार पेक्षा जास्त इंग्रजी शब्द टाइप करू शकतात. पण केवळ उजव्या हाताने सुमारे ३०० शब्द टाईप करता येतात. ही एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती आहे जी डावखुऱ्या लोकांना यूनिक बनवते.

उजव्या बाजूच्या मेंदूचा करतात वापर

रिपोर्टनुसार, डावखुरे लोक मेंदूच्या उजव्या बाजूचा जास्त वापर करतात. मानवी मेंदू क्रॉस-वायर्ड आहे. मेंदूचा उजवा अर्धा भाग शरीराच्या डाव्या बाजूला नियंत्रित करतो आणि डाव्या बाजूचा भाग उजव्या भागाला. त्यामुळे उजव्या हाताच्या लोकांपेक्षा डाव्या हाताचे लोक मेंदूच्या उजव्या बाजूचा जास्त वापर करतात.

लेफ्ट हॅन्डर्स लोक असतात क्रिएटिव्ह

चित्रकार, संगीतकार आणि अगदी आर्किटेक्ट सारखे कलाकार बहुतेक डावखुरे असतात, असे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, यावरून बराच वाद निर्माण झाला आहे.

काही खेळांमध्ये मिळतो फायदा

काही खेळांमध्ये डावा हात वापरणाऱ्या खेळाडूंना फायदा होतो. समोरासमोर असताना ते सहसा खेळात पारंगत असतात. बेसबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी आणि टेनिस सारख्या खेळांमध्ये डावखुऱ्या खेळाडूंना अनेकदा विजयासाठी प्लस पॉईंट्स मिळू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग