International Kite Festival in Kutch: लवकरच मकरसंक्रांतीचा सण येतोय. याशिवाय डिसेंबर महिन्यात फिरायचे प्लॅन झाले नसतील तर जानेवारी महिन्यात तुम्ही हे प्लॅन वर्कआउट करू शकता. तुम्ही जानेवारीत कुठे फिरायला जायचा विचार करत असाल तर आधी गुजरातला प्राधान्य द्या. कारण गुजरातच्या कच्छमध्ये ८ ते १४ जानेवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०२४ साजरा केला जात आहे. या फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील लोक त्यांची पतंग उडवण्याची कला दाखवताना दिसतील. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे पतंग पाहायला मिळतील. एवढेच नाही तर या काळात तुम्ही संपूर्ण गुजरातचे सांस्कृतिक रंग पाहू शकता आणि येथील कपडे, भोजन, संगीत आणि कलेचा आनंद घेऊ शकता.
कच्छच्या रणमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे खास असते कारण त्याची स्वतःची वेगळीच सुंदरता असते. रण हे जगातील सर्वात मोठे मिठाच्या वाळवंटांपैकी एक आहे. कच्छ म्हणजे कासव आणि रण म्हणजे वाळवंट, हे नाव जगाच्या नकाशावर उलट्या कासवासारखे असल्यामुळे हे नाव पडले.
कच्छच्या रणमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवासाठी, तुम्ही गाडी, ट्रेनने प्रवास करू शकता. तुम्हाला होडका गावात पोहचायचे आहे तिथे राहायला जागा मिळेल.
या उत्सवात तुम्ही पारंपारिक कच्छ पोशाख घालून सहभागी व्हावे. ते घालायचे नसेल तर तुम्ही कोणतेही ट्रॅडीशल कपडे घालून या उत्सवात सहभागी होऊ शकता.
या पतंग मोहोत्सवाशिवाय तुम्हाला पतंग, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साही उत्तरायण उत्सव देखील अनुभवता येईल. याशिवाय, तिथे तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रीचे जेवण आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी विशेष तयारी पाहायला मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)