International Girl Child Day: तुमच्या मुलीला बनवा धाडसी! स्व:ताच्या संरक्षणासाठी शिकवा 'या' सेफ्टी टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Girl Child Day: तुमच्या मुलीला बनवा धाडसी! स्व:ताच्या संरक्षणासाठी शिकवा 'या' सेफ्टी टिप्स

International Girl Child Day: तुमच्या मुलीला बनवा धाडसी! स्व:ताच्या संरक्षणासाठी शिकवा 'या' सेफ्टी टिप्स

Published Oct 11, 2024 09:05 AM IST

Safety Tips for Traveling Alone: जर तुम्ही एकटेच घराबाहेर पडत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही तुमची सुरक्षा सहज करू शकता.

International Girl Child Day 2024
International Girl Child Day 2024 (freepik)

International Girl Child Day 2024:  आजच्या काळात बहुतांश ठिकाणी महिलांसाठी घराबाहेर पडणे अजिबात सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत, स्त्रिया अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित दिसतात. खासकरून सायंकाळच्या वेळी महिलांबाबत घडणाऱ्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एकटेच घराबाहेर पडत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही तुमची सुरक्षा सहज करू शकता. आज जगभरात 'जागतिक बालिका दिन' साजरा केला जात आहे. या निमित्ताने समाजात मुलींचे महत्व अधोरेखित केले जाते. त्यामुळेच मुलींनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी इतरांवर अवलंबून राहण्याची त्यांना गरज नाही. कारण प्रत्येक मुलीमध्ये दुर्गा मातेची शक्ती असते. आज बालिका दिनानिमित्त आपण मुलींसाठी काही सेफ्टी टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून घरातून एकटे बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेता येईल.

जवळच्या व्यक्तीसोबत संपर्कात रहा-

जेव्हा तुम्ही घराबाहेर एकटे असता तेव्हा तुम्ही तुमचा भाऊ, बहीण, वडील, पती किंवा मित्रमैत्रिणी यांसारख्या जवळच्या व्यक्तीला फोन करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यांना तुमच्या घरी पोहोचण्याची वेळ आणि ऑटो किंवा कॅबचा नंबर सांगून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला अडचण आल्यास ते तुमच्या पर्यंत सहजपणे पोहचू शकतात.

रस्त्यावर सुरक्षित रहा-

रस्त्याच्या कडेला एकटे चालत असताना नेहमी ट्रॅफिकच्या विरुद्ध दिशेने चाला. त्यामुळे समोरून येणारी वाहतूक पाहता येईल आणि मागून हल्ला होण्याची भीती कमी होईल. बॅग किंवा पर्स रस्त्याच्या ऐवजी भिंतीकडे ठेवा. याशिवाय कोणी तुमचा पाठलाग करत असेल तर जवळच्या घराची डोअर बेल वाजवा आणि मदतीसाठी विचारा.

सुरक्षितपणे प्रवास करा-

कॅब बुक करताना टॅक्सी स्टँड किंवा टॅक्सी सेवेची मदत घ्या. नेहमी प्री-पेड बूथवरूनच ऑटो बुक करा. यामुळे तुमच्याशिवाय इतरांनाही टॅक्सी किंवा ऑटोची माहिती होईल. तसेच, एकट्याने प्रवास करताना कधीही रिकाम्या बसमध्ये चढू नका. कॅब किंवा ऑटोमध्ये बसताच त्याचा नंबर जवळच्या व्यक्तीला शेअर करा. आणि तुमची लाईव्ह लोकेशन त्यांना पाठवत राहा.

सुरक्षा साधनांची मदत घ्या-

एकटे असताना घटना टाळण्यासाठी तुम्ही काही सुरक्षा साधने वापरू शकता. अशा परिस्थितीत, पेपर स्प्रे, नेल फाइलर, सेफ्टी पिन, हिल्स, बेल्ट किंवा स्कार्फमध्ये गुंडाळलेला दगड वापरून हल्लेखोरावर हमला करू शकता.

स्वतःला तयार ठेवा-

एकटीने प्रवास करताना तुम्हाला असुरक्षित वाटत असल्यास, तुमच्या जवळच्या व्यक्तीला लगेच ऑटो किंवा कॅबचा नंबर मेसेज करा. याशिवाय, तुम्ही गुगल मॅपवर जवळपासच्या पोलिस स्टेशनचे लोकेशन आणि पीसीआर देखील तपासू शकता. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा किंवा पोलिस चौकीचा क्रमांक स्पीड डायलवर ठेवा आणि गरज भासल्यास लगेच त्या क्रमांकावर कॉल करा.

रस्त्यावर सावध रहा-

एकट्याने प्रवास करताना निर्जन रस्त्यावरून जाऊ नका. अशा परिस्थितीत, ओळखीच्या आणि गर्दीच्या रस्त्यावर चालणे चांगले. तसेच रात्रीच्या वेळी अंधारलेले रस्ते टाळा आणि फक्त उजेड असलेल्या रस्त्यावर प्रवास करा. यावेळी कोणत्याही अनोळखी शॉर्टकट रस्त्याचा आधार घेऊ नका.

Whats_app_banner