Friendship Day Wishes : आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या 'फ्रेंडशिप डे' च्या मराठीत शुभेच्छा, पाठवा हे खास संदेश
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Friendship Day Wishes : आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या 'फ्रेंडशिप डे' च्या मराठीत शुभेच्छा, पाठवा हे खास संदेश

Friendship Day Wishes : आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या 'फ्रेंडशिप डे' च्या मराठीत शुभेच्छा, पाठवा हे खास संदेश

Published Jul 29, 2024 07:31 PM IST

International Friendship Day 2024: दरवर्षी ३० जुलै रोजी इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास प्रसंगी तुमच्या मित्रांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथे पाहा फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश

इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा संदेश
इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा संदेश (freepik)

Happy International Friendship Day Wishes in Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र असतो ज्याच्यासोबत ते आपल्या मनातील सर्व गोष्टी शेअर करतात. या अनमोल नात्याचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी ३० जुलै रोजी इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास दिवशी तुम्हाला तुमच्या मित्राला खास शुभेच्छा द्यायच्या असतील हे तर तुम्ही हे संदेश पाठवू शकता. आपल्या मित्रांना मराठीत शुभेच्छा देण्यासाठी येथे पाहा बेस्ट फ्रेंडशिप डे शुभेच्छा मेसेज.

 

बेस्ट हॅपी फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश

मैत्री असावी मना-मनाची

मैत्री असावी जन्मो-जन्मोची

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी

Happy Friendship Day!

 

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलता ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते....

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

साद घाला कधीपण, उभे राहू आम्ही पण,

तुमचे मन हेच आमचे सिंहासन,

आमची पण करत जा आठवण,

फक्त बोलत नाही, तर करून दाखवू

तुमच्यासाठी काही पण...

Happy Friendship Day!

बंधनापलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा,

दुःखाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

काही शब्द नकळत कानावर पडतात,

कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात,

खरं तर ही मैत्रीची नाती अशीच असतात,

आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात

Happy Friendship Day!

 

रक्ताचे नाते नसतानाही मनात घर करणारे

मित्र म्हणून हक्काने योग्य मार्ग दाखवणारे

माझे जिवलग सखे सोबती

फ्रेंडशिप डे च्या खूप शुभेच्छा!

 

चंद्राला साथ चांदण्याची

धरतीला साथ गगनाची

अन् मला लाभलेली साथ

तुमच्या सारख्या मित्रांची

जणू ओळख पवित्र नात्याची

Happy Friendship Day!

 

प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा

मित्रांच्या कट्ट्यांवर येणारी मजा

काही औरच असते...

हॅपी फ्रेंडशिप डे!

 

चांगल्या काळात हात धरणे

म्हणजे मैत्री नव्हे

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री...

Happy Friendship Day!

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो

लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो,

लोक जगात मित्र पाहतात,

आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो...

Happy Friendship Day!

Whats_app_banner