International Day of Happiness: एकटेपणातही अनुभवता येईल आनंद, जर अंगीकारल्या या गोष्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Day of Happiness: एकटेपणातही अनुभवता येईल आनंद, जर अंगीकारल्या या गोष्टी

International Day of Happiness: एकटेपणातही अनुभवता येईल आनंद, जर अंगीकारल्या या गोष्टी

Mar 20, 2024 11:56 PM IST

International Day of Happiness 2024: दरवर्षी २० मार्च रोजी इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना आनंदी राहणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देणे आहे. एकटेपणात आनंदी रहायचे असेल तर या गोष्टी करा.

एकटेपणात आनंदी राहण्यासाठी टिप्स
एकटेपणात आनंदी राहण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Find Happiness: आनंदी राहणे ही प्रत्येक माणसाची गरज आहे. कारण ते आपल्याला निरोगी ठेवण्यासही मदत करते. इंटरनॅशनल डे ऑफ हॅपिनेस (international day of happiness) दरवर्षी साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना आठवण करून देणे आहे की आनंदी राहणे किती महत्त्वाचे आहे. प्रत्येक लहान-मोठा प्रसंग साजरे करणे आणि लोकांमध्ये आनंद वाटणे महत्त्वाचे आहे. पण हे आवश्यक नाही की तुम्ही कोणाच्या सोबत असतानाच आनंदी असाल. एकटे राहूनही माणूस आनंदी राहू शकतो. आपल्याला फक्त आनंदी कसे राहायचे हे माहित असणे आवश्यक आहे. या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे तुम्हाला नेहमी आनंदी राहण्यास मदत होते.

स्माइल करा

स्माईल केल्याने तुम्ही आनंदी व्हाल, पण तुम्ही तेव्हाच स्माइल कराल जेव्हा तुम्ही आनंदी असाल. ही टू वे सर्व्हिस आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा डोपामाइन हार्मोन सोडला जातो. जे तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी हसणे तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवण्यास मदत करेल.

व्यायाम

प्रत्येकासाठी व्यायामाचा त्यांच्या दिनक्रमात समावेश करणे अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही अगदी दहा मिनिटे व्यायाम सुरू करता तेव्हा तुम्हाला आनंद होतो. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा त्याचा केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर तणाव, चिंता आणि नैराश्याच्या भावना कमी होण्यास मदत होते. यामुळे आत्मविश्वास आणि आनंद दोन्ही वाढते.

पुरेशी झोप

कोणत्याही प्रौढ व्यक्तीने किमान ७-८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे शरीर अधिक विश्रांतीची मागणी करते किंवा तुम्हाला तुमच्या मनात गोंधळ वाटत असेल, तेव्हा समजून घ्या की तुमच्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप केवळ मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करत नाही तर भावनिक आरोग्य राखण्यास देखील मदत करते. त्यामुळे तुमची झोप सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा.

मूडनुसार फूड खा

कार्बोहायड्रेटयुक्त अन्न तुमचा मूड ठीक करण्यास मदत करते. बरेचदा लोक वजन कमी करण्यासाठी आहारातून कार्ब्स काढून टाकतात. कमी कर्बोदकांऐवजी, साखर आणि स्टार्च आहारातून काढून टाका. भाज्या, बीन्स, धान्ये कर्बोदकांची पोकळी भरून काढतील आणि सेरोटोनिन वाढवतील.

आपल्या आयुष्याला म्हणा थँक्स

जीवनात समाधान खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करते. जीवनात मिळणाऱ्या गोष्टींसाठी दररोज देवाचे आभार मानल्याने मन प्रसन्न होते. जेव्हा तुम्ही दररोज देवाचे आभार मानून सुरुवात करता तेव्हा आनंदी राहणे सोपे होईल.

इतरांची स्तुती नक्की करा

प्रत्येकाला स्तुती ऐकायला आवडते. तुमची स्तुती होत नसली तरी समोरच्या व्यक्तीची स्तुती करण्यापासून स्वतःला थांबवू नका. संशोधनात असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही कोणाची स्तुती करता तेव्हा मन प्रसन्न होते.

दीर्घ श्वास घ्या

जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल. हळू, खोल श्वास घेतल्याने तणाव कमी करणे सोपे होते आणि तुमचा मूड बदलतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner