International Chocolate Day: चॉकलेटबाबत आहेत 'या' रंजक गोष्टी, ९९ टक्के चॉकलेटप्रेमींना माहितीच नाही-international chocolate day 2024 there are many interesting facts about chocolate that many people do not know ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Chocolate Day: चॉकलेटबाबत आहेत 'या' रंजक गोष्टी, ९९ टक्के चॉकलेटप्रेमींना माहितीच नाही

International Chocolate Day: चॉकलेटबाबत आहेत 'या' रंजक गोष्टी, ९९ टक्के चॉकलेटप्रेमींना माहितीच नाही

Sep 13, 2024 10:36 AM IST

Benefits of eating chocolate: चॉकलेटबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. चॉकलेटचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे.

international chocolate day
international chocolate day (pixabay )

Interesting facts about chocolate:  आंतरराष्ट्रीय चॉकलेट डे आज अर्थातच १३ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस चॉकलेटबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याची आणि आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. चॉकलेटचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि विशेष उपक्रम आयोजित केले जातात. चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजणच मोठ्या चवीने खातात. परंतु चॉकलेटबाबत अशी काही रंजक तथ्ये आहेत जे अनेक लोकांना माहितीच नाहीत. आज आपण याच तथ्यांबाबत घेणार आहोत.

  • चॉकलेटबाबत काही रंजक तथ्ये-

-चॉकलेट बनवण्याची सर्वात पहिली मशीन १७८० मध्ये स्पेनमधील बार्सिलोना इथे बनली होती.

-एका संशोधनात असे आढळून आले आहे की डार्क चॉकलेट खाल्ल्याने डोळ्यांची शक्ती वाढते आणि मेंदूची काम करण्याची क्षमताही वाढते.

-धावपळीच्या आयुष्यात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत चॉकलेट तुम्हाला मदत करू शकते. असं म्हटलं जातं की, चॉकलेटच्या वासाने तणाव दूर होतो. याशिवाय ते खाल्ल्याने ऊर्जाही मिळते.

-तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण व्हाईट चॉकलेटमध्ये कोको सॉलिड किंवा कोको लिकर नसतो. हे खरं तर चॉकलेट समजलं जात नाही.

-इंडियाना, यूएसए येथे केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, स्पोर्ट्स ड्रिंक्सऐवजी दूध चॉकलेट पिणाऱ्या सायकलिस्टनी जास्त स्कोअर केला होता.

-४५० ग्रॅम चॉकलेट तयार करण्यासाठी ४०० कोको बीन्स आवश्यक असतात.

-१९४१ मध्ये दुसऱ्या महायुद्धात लष्करातील सैनिकांसाठी प्रसिद्ध M&M चॉकलेट्स तयार करण्यात आली होती.

-जगातील सुमारे ४० टक्के बदाम चॉकलेट बनवण्यासाठी वापरले जातात.

-चॉकलेट खाल्ल्याने दात किडतात असे सामान्यतः म्हटले जाते. परंतु चॉकलेटमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे दात किडत नाहीत.

-खोकल्यावर औषधापेक्षा चॉकलेट अधिक प्रभावी आहे.

-अमेरिकेतील सर्वात मोठी चॉकलेट कंपनी हर्शीज ही आहे. याठिकाणी दरवर्षी ४० किलो कोटी चॉकलेट बनवली जाते.

-प्रत्येक सेकंदाला अमेरिकेत १०० पौंड चॉकलेट खाल्लं जातं.

-जगातली सर्वात मोठ्या चॉकलेट बारचे वजन ५७९२ किलोग्रॅम आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner