International Chess Day History and Significance: सर्वात आवडत्या बोर्ड गेम्सपैकी एक, बुद्धिबळ जगातील बहुसंख्य लोक खेळतात. अनेकदा खऱ्या आयुष्याचे संदर्भ म्हणून वापरल्या जाणाऱ्या बुद्धिबळाच्या खेळात राजाला वाचवण्यासाठी समर्पण, एकाग्रता आणि विचारपूर्वक चालीची गरज असते. बुद्धिबळाच्या खेळात आपण केलेल्या एका मूव्हचा पुढील मूव्हच्या सीरिजवर कसा परिणाम होऊ शकतो हे शिकणे समाविष्ट आहे. बुद्धिबळ हा जगभरातील कोट्यवधी लोकांचा आवडता बोर्ड गेम आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन २० जुलै रोजी साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि सेलिब्रेशन जाणून घ्या.
१९९६ मध्ये युनेस्कोने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवसाची घोषणा केली, ज्याला सामान्यत: त्याच्या फ्रेंच संक्षिप्त नावाने फिडे म्हणून ओळखले जाते. फिडेची स्थापना फ्रान्समधील पॅरिस येथे झाली असून सध्या स्वित्झर्लंडमध्ये त्याचे मुख्यालय आहे. फिडे ही विविध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघांना जोडण्यासाठी जबाबदार असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांसाठी नियामक संस्था म्हणून कार्य करते. फिडेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९९९ मध्ये मान्यता दिली होती.
बुद्धिबळ जगातील बहुसंख्य लोकसंख्येला आवडते आणि ते या खेळाचा आनंद घेतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या मित्रांना भेटणे आणि बुद्धिबळ खेळणे हे आहे. ज्यांना खेळाच्या नियमांची माहिती नाही, त्यांच्यासाठी हा दिवस खेळ शिकण्याची सुरुवात करण्यासाठी आणि बुद्धिबळ खेळ जिंकण्याच्या चाली आणि ट्रिक्स बद्दल जाणून घेण्यासाठी एक चांगला दिवस आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या