International Cat Day: तुमच्याजवळही आहेत गोंडस कॅट? मांजराबद्दल 'ही' रोचक तथ्ये करतील अवाक्
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Cat Day: तुमच्याजवळही आहेत गोंडस कॅट? मांजराबद्दल 'ही' रोचक तथ्ये करतील अवाक्

International Cat Day: तुमच्याजवळही आहेत गोंडस कॅट? मांजराबद्दल 'ही' रोचक तथ्ये करतील अवाक्

Published Aug 08, 2024 10:48 AM IST

International Cat Day 2024: आज ८ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय मांजर दिन' साजरा केला जात आहे. हा दिवस जगभरातील आपल्या गोंडस मांजरांना समर्पित आहे.

International Cat Day 2024
International Cat Day 2024

International Cat Day 2024:   बहुतांश लोकांना पाळीव प्राणी घरात ठेवणे प्रचंड आवडते. यामध्ये लोकांना श्वान, ससा आणि मांजरी पाळीव प्राणी म्हणून पाळणे आवडते. यासाठी, सामान्य मांजरींव्यतिरिक्त, लोक मांजरींच्या अनेक प्रजाती पाळायला प्राधान्य देत आहेत. शिवाय अगदी प्रेमाने त्यांची काळजी घेतात. यामुळे आज ८ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय मांजर दिन' साजरा केला जात आहे. हा दिवस जगभरातील आपल्या गोंडस मांजरांना समर्पित आहे. पण आज आम्ही तुम्हाला मांजरींशी संबंधित अशी काही तथ्ये सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

'आंतरराष्ट्रीय मांजर दिवस'ची सुरुवात-

जगभरात विविध डे साजरे केले जातात. त्या-त्या गोष्टींना महत्व देण्यासाठी किंवा त्यांचे जतन करण्यासाठी असे दिवस साजरे होतात. त्याचप्रमाणे मांजर दिनसुद्धा साजरा करण्यात येतो. जगभरात मांजर दिन साजरा करण्याची सुरुवात २००२ पासून झाल्याचे दिसून येते. असे म्हटले जाते की, त्या काळात, मांजरींच्या वाईट अवस्थेबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि स्थिती सुधारण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय मांजर दिवस' साजरा करण्यास सुरुवात झाली. महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण निधीने या दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून, हा विशेष दिवस जगभरात साजरा केला जात आहे. यादिवसाला अनुसरून विविध कार्यक्रम आणि कॅट शो आयोजित केले जातात.

मांजरांबद्दल रोचक तथ्ये-

-रिपोर्ट्सनुसार जगभरात सुमारे ५०० दशलक्ष पाळीव मांजरी आहेत.

-मांजरींना एकूण १८बोटे असतात. त्यांच्या पुढच्या पंजात ५-५ आणि त्यांच्या मागच्या  पंजात ४-४ अशी असतात.

-सिंगापुरा ही मांजरींची सर्वात लहान प्रजाती आहे.

-तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मांजर 3mph वेगाने धावू शकते.

-मांजर त्यांच्या उंचीच्या ६ पट वर उडी मारू शकतात. हे मांजरींच्या पायांच्या मजबूत  स्नायूंमुळे शक्य होते.

-असे म्हटले जाते की, मांजरीच्या आयुष्याचे एक वर्ष मानवी आयुष्याच्या १५वर्षांच्या  बरोबरीचे असते.

-मांजर दररोज १३ ते १६ तासांची झोप घेतात. जो त्यांच्या आयुष्यातील सुमारे ७० टक्के  वेळ असतो.

-मेन कून ही पाळीव मांजरींची सर्वात मोठी जाती आहे.

-सर्वात वृद्ध मांजर ३८ वर्षांची होती.

-शिवाय आतापर्यंतची सर्वात उंच मांजर ४८.५ इंच इतकी आहे.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

Whats_app_banner