मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Carrot Day 2024: गाजर खाण्याचे किती आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या

International Carrot Day 2024: गाजर खाण्याचे किती आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 04, 2024 11:01 AM IST

Health Benefits of Eating Carrot: दरवर्षी ४ एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा केला जातो. गाजर प्रेमींसाठी हा दिवस खास असतो.


डोळे ते हाडं अनेक अवयवांसाठी गाजर खाणे फायदेशीर ठरते.
डोळे ते हाडं अनेक अवयवांसाठी गाजर खाणे फायदेशीर ठरते. (Unsplash)

Healthy Eating: दरवर्षी आंतरराष्ट्रीय गाजर दिवस जगभरात ४ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस गाजर प्रेमींना समर्पित आहे. तुम्ही विचार करत असाल हा दिवस साजरा करण्याचा काय फायदा? हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लोकांना गाजराच्या फायद्यांविषयी माहिती करून देणे हा आहे. गाजर त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध आहे. पोषक तत्वांनी युक्त गाजर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गाजर अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. हे सलाड म्हणून खाणे फायदेशीर ठरते. आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय गाजर दिनानिमित्त गाजराचे फायदे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पचन सुधारणे

गाजरात भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

International Carrot Day: दरवर्षी का साजरा केला जातो जागतिक गाजर दिवस? हा आहे इतिहास

रोग प्रतिकारशक्ती वाढते

गाजरात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

वजन कमी करण्यास होते मदत

त्यात कॅलरीज कमी आहेत आणि फायबर भरपूर आहे. याचे दररोज सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच वाढते वजन कमी करता येते.

Best milk drinking Time: दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? ज्यामुळे शरीराला मिळतील अधिक फायदे!

डोळ्यांसाठी आहे खूप फायदेशीर

गाजरात बीटा कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे व्हिटॅमिन डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्व आवश्यक आहे. हे रातांधळेपणासारख्या समस्या टाळण्यास मदत करते

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे ते केस निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते.

International Children's Book Day 2024: का साजरा करतात आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन? जाणून घ्या

हाडांसाठी आहे उत्तम

गाजरमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते.

मेंदूसाठी आहे फायदेशीर

गाजरामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel