मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Burger Day 2024: मेक्सिकन बर्गरसोबत साजरा करा बर्गर डे, ट्राय करा ही रेसिपी

International Burger Day 2024: मेक्सिकन बर्गरसोबत साजरा करा बर्गर डे, ट्राय करा ही रेसिपी

May 28, 2024 11:37 PM IST

Burger Recipe: जगभरात २८ मे रोजी आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस साजरा केला जातो. या दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही मेक्सिकन बर्गरची रेसिपी ट्राय करू शकता.

आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस - मेक्सिकन बर्गरची रेसिपी
आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस - मेक्सिकन बर्गरची रेसिपी (unsplash)

Mexican Burger Recipe: लहान मुले असो वा मोठे बर्गर खायला सर्वांनाच आवडते. तुम्हाला माहीत आहे का तुमच्या या आवडत्या जंक फूडचा सुद्धा एक खास दिवस आहे. होय, जगभरात २८ मे रोजी आंतरराष्ट्रीय बर्गर दिवस साजरा केला जातो. तुम्हाला सुद्धा हा स्पेशल दिवस खास पद्धतीने साजरा करायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी टेस्टी बर्गर बनवू शकता. नेहमीचा साध्या बर्गरऐवजी ट्राय करा मेक्सिकन बर्गरची रेसिपी. चिकन लव्हर्सला हा बर्गर खूप आवडेल. विशेष म्हणजे हा बर्गर घरी बनवणे खूप सोपे आहे आणि ते झटपट तयार सुद्धा होते. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या कसा बनवायचा मेक्सिकन बर्गर.

ट्रेंडिंग न्यूज

मेक्सिकन बर्गर बनवण्यासाठी साहित्य

- ४ बर्गर बन्स

- ४ चीज स्लाइस

- २५० ग्रॅम चिकन

- २ टेबलस्पून चिपोटल सॉस

- १ एवोकॅडो

- १ मूठभर चेरी टोमॅटो

- २ चमचे लिंबाचा रस

- १ मूठभर बेबी लेट्यूस

- १ मूठभर जेलेपेनो

- १ टेबलस्पून लसूण

- २ चमचे रिफाइंड तेल

- काळी मिरी आवश्यकतेनुसार

- मीठ चवीनुसार

मेक्सिकन बर्गर बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम चिकन धुवून स्वच्छ करून घ्या. ते वाळवून हलके बारीक करून त्यात चिपोटल सॉस मिक्स करा. आता हे बाजूला ठेवून द्या. ते १५ मिनीटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. आता एका पॅन मध्ये १ टेबलस्पून तेल घ्या. आता बन्सचे दोन भाग करा आणि तळापासून तपकिरी होईपर्यंत टोस्ट करा. एका बाऊलमध्ये एवोकॅडो घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. त्यात जेलेपेनो, बारीक चिरलेला लसून, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेले चेरी टोमॅटो टाका. आता यात मीठ आणि काळी मिरी देखील टाका. 

तयार केलेले एवेकॅडोचे मिश्रण बन वर लावा आणि त्यावर चिकन सोबत चीज आणि काही लेट्यूस टाका. तुम्ही त्यात बार्बेक्यू सॉस देखील टाकू शकता. तुमचा मेक्सिन बर्गर रेडी आहे.

WhatsApp channel