Sujan Jawai in Worlds Top 50 Hotels: जगातील टॉप ५० हॉटेल्समध्ये केवळ एका भारतीय हॉटेलचा समावेश करण्यात आला आहे. हे हॉटेल म्हणजे राजस्थानच्या जवाई बंदमध्ये वसलेले सुजान जावई आहे. १७ सप्टेंबर रोजी लंडन येथे झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात जगातील ५० सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली.
या यादीत कॅपेला बँकॉकने अव्वल स्थान पटकावले आहे. थायलंडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये चाओ फ्राया नदीचे दर्शन घडते. हे निसर्ग सौंदर्याची आणि चैतन्यमय शहराच्या वातावरणाची सांगड घालून पाहुण्यांना रिलॅक्सेशन आणि शहरी राहणीमानाचा परफेक्ट मिक्स देते. या हॉटेलमध्ये नदीवर १०१ सुट्स आणि व्हिला आहेत, जे कोझी आणि वैयक्तिक स्टेची सुविधा देतात. एक अनोखा अनुभव निर्माण करण्यावर हॉटेलचा भर त्याच्या आधुनिक जेवणाचे पर्याय आणि सुप्रसिद्ध ऑरिगा स्पामध्ये दिसून येतो, ज्यामुळे ते व्हिजीटर्ससाठी एक खास ठिकाण बनते.
जगातील पहिल्या पाच हॉटेल्समध्ये मोल्ट्रासिओ (इटली), रोजवूड हाँगकाँग, शेवल ब्लँक पॅरिस (फ्रान्स) आणि अप्पर हाऊस (हाँगकाँग) यांचा समावेश आहे. जगातील टॉप ५० हॉटेल्समध्ये सोळा आशियाई हॉटेल्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रॅफल्स सिंगापूर, अमन टोकियो (जपान), सोनेवा फुशी (मालदीव), निही सुम्बा (इंडोनेशिया) आणि मंदारिन ओरिएंटल बँकॉक (थायलंड) या आशियाई हॉटेल्सचा समावेश आहे.
याशिवाय फोर सीझन बँकॉक (थायलंड), देसा बटाटा हेड (बाली), बल्गेरी टोकियो (जपान), द सियाम (थायलंड), पार्क हयात क्योटो (जपान), कॅपेला सिंगापूर आणि अमंगल्ला (श्रीलंका) या आशियाई हॉटेल्सचा समावेश आहे.
प्राचीन ग्रॅनाइट खडकांच्या मधोमध वसलेले सुजान जावई पर्यटकांना जंगली बिबट्या स्थानिक समुदायांसोबत मुक्तपणे राहतात असा अनुभव देतात. जंगलात असलेल्या या कॅम्पमध्ये पाहुण्यांना निसर्ग आणि वन्यजीव, विशेषत: बिबट्यांचा शोध घेता येतो.
नैसर्गिक सौंदर्य आणि इको-कॉन्शियस लक्झरी मिश्रणासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण भारतातील सर्वात नयनरम्य ठिकाणांपैकी एक मानले जाते. व्हिजीटर्स रबारी मेंढपाळांसोबत वेळ घालवू शकतात, त्यांची संस्कृती आणि कॅम्पच्या संवर्धन प्रयत्नांबद्दल जाणून घेऊ शकतात. ज्यामुळे ही भेट साहसी आणि समृद्ध होऊ शकते.