Rasmalai Ranked in Top Cheese Desserts: रसमलाई ही एक स्वादिष्ट भारतीय मिठाई आहे, जी त्याच्या समृद्ध आणि मलईयुक्त चवीमुळे जगभरात लोकप्रिय झाली आहे. हा गोड पदार्थ पनीर आणि दुधाचा वापर करून तयार केला जातो. बऱ्याचदा खास प्रसंगी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी ट्रीट म्हणून सर्व्ह केला जातो. अलीकडेच जगभरातील टॉप १० बेस्ट चीज डेझर्टच्या यादीत रसमलाईचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी टेस्टॲटलासने शेअर केली आहे, जी एक ऑनलाइन ट्रॅव्हल आणि फूड गाईड आहे, जी जगभरातील स्थानिक रेसिपी एकत्र करते आणि फूड रिव्ह्युव देते.
ही पोस्ट शेअर करताना टेस्टॲटलासने लिहिलं आहे की, "तुमची आवडते निवडा!" या यादीत पोलंडमधील सर्निक या मिठाईने पहिले स्थान पटकावले आहे. तर दुसरा क्रमांक भारताच्या रसमलाईने पटकावला आहे. ग्रीसचा स्फाकियानोपिटा, अमेरिकेचा एनवायसी पद्धतीचा चीजकेक आणि जपानी चीजकेक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. शेवटच्या पाच डेझर्टमध्ये स्पेनचा बास्क चीजकेक, हंगेरीचा राकोझी टुरोस, ग्रीसचा मेलोपिटा, जर्मनीचा कासेकुचेन आणि चेक प्रजासत्ताकचा मिसा झी यांचा समावेश होता.
ही पोस्ट तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून आतापर्यंत त्याला जवळपास १३ हजार पेक्षा जास्त लाइक्स आणि असंख्य कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एका व्यक्तीने लिहिले की, "रसमलाई देवाचे अमृत आहे याची पुष्टी करू शकतो." तर दुसऱ्या युजरने, "ग्रेट! आज मी रसमलाई खाणार आहे" असे म्हटले. "रसमलाई म्हणजे वेलची, केशर आणि पिस्ता चीज क्लाऊड खाण्यासारखं आहे!" असे तिसऱ्याने पोस्ट केले. चौथ्याने कमेंट केली, "रसमलाई हे अल्टीमेट डेझर्ट आहे!" तर पाचवा म्हणाला, "माझ्यासाठी, तुर्की कुनेफे आणि रसमलाई सर्वोत्तम आहेत."
सहाव्या युजनरे सांगितले की, "रसमलाई मूळची पश्चिम बंगालची असून ती भारतातील सर्वात गोड पदार्थांपैकी एक आहे. रसमलाई ही केवळ पश्चिम बंगालचीच नव्हे तर संपूर्ण देशाची शान आहे. "रसमलाई चांगली आहे, पण जर आपण ती एक आयकॉनिक कॉटेज चीज मिठाई निवडत असू तर ती रसगुल्ला असावे," असे सातव्या युजरने म्हटले.
संबंधित बातम्या