मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Indian Army Day 2024: या मेसेजसह सेलिब्रेट करा भारतीय लष्कर दिन, बघा शुभेच्छा संदेश!

Indian Army Day 2024: या मेसेजसह सेलिब्रेट करा भारतीय लष्कर दिन, बघा शुभेच्छा संदेश!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 15, 2024 09:00 AM IST

Indian Army Day 2024 Wishes: भारतीय लष्कर दिन दरवर्षी १५ जानेवारीला साजरा केला जातो. यावेळी आपला भारत देश ७६ वा लष्कर दिन साजरा करत आहे.

Indian Army Day Quotes
Indian Army Day Quotes (livehindustan)

Indian Army Day 2024 Messages: आज देश भारतीय लष्कर दिन साजरा करत आहे. दरवर्षी १५ जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. भारतीय लष्कर सेना नेहमीच देशाच्या सुरक्षेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. (Happy Army Day Wishes in Marathi) एखादे युद्ध असो, देशातील मोठ्या दुर्घटनेनंतर बचावकार्य असो किंवा आपात्कालीन परिस्थितीत गरजू लोकांना लवकरात लवकर मदत करणे असो, आपले भारतीय सैनिक सर्वत्र तत्परतेने काम करतात.

भारतीय लष्कराची स्थापना ब्रिटीश साम्राज्यात झाली होती. या काळात लष्करातील वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश असायचे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही लष्करात ब्रिटिश वंशाचे वरिष्ठ अधिकारी होते. १९४९ मध्ये जनरल फ्रान्सिस बुचर हे शेवटचे ब्रिटिश कमांडर होते. त्यांच्या जाण्यानंतर लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी बनले.

१५ जानेवारीलाच केएम करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची धुरा हातात घेतली. भारतीय लष्करासाठी हा अत्यंत खास क्षण होता. या दिवशी प्रथमच देशाच्या लष्कराचे नेतृत्व एका भारतीयाच्या हाती आले. याच कारणांमुळे दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय सेना दिन साजरा केला जातो. याच खास दिनी तुम्ही (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) संदेश, कोट्स, व्हॉट्सअ‍ॅप शुभेच्छा, GIF शुभेच्छा, फोटो एसएमएस पाठवून भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

बघा शुभेच्छा संदेश

> कितीही श्रीमंती असली तरीही

हा पोशाख आणि हा रुबाब

तुम्ही विकत घेऊ शकत नाही

तो कमवावा लागतो

भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> भारतमातेच्या संरक्षणासाठी

आपल्या जीवावर उदार होऊन

रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..!!

> भारतीय सेना दिन

देशासाठी झटणाऱ्या शूरवीरांना सलाम!

Happy Indian Army Day!

> जो पूरी रात जागते हैं जरूरी नहीं वो सिर्फ आशिक ही हो,

वो देश पर मर मिटने वाला जवान भी हो सकता है.

Indian Army Day!

> राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक

असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!

भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

WhatsApp channel