Coconut Biscuit Recipe : स्वातंत्र्य दिनी करा तोंड गोड! घरी बनवा बेकरी स्टाईल कोकोनट बिस्किटं-independence day special coconut biscuit recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut Biscuit Recipe : स्वातंत्र्य दिनी करा तोंड गोड! घरी बनवा बेकरी स्टाईल कोकोनट बिस्किटं

Coconut Biscuit Recipe : स्वातंत्र्य दिनी करा तोंड गोड! घरी बनवा बेकरी स्टाईल कोकोनट बिस्किटं

Aug 15, 2022 08:40 AM IST

Independence Day Special Recipe: ही एग्लेस बिस्किट रेसिपी आहे, त्यामुळे प्रत्येकजण त्याचा आनंद घेऊ शकतो.

<p>प्रातिनिधिक फोटो</p>
<p>प्रातिनिधिक फोटो</p> (Freepik)

Special Recipe for 15 August: आज आपला देश ७५ वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करत आहे. या आनंदाच्या दिनी आणि आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना तोंड गोड झालाच पाहिजे. याचसाठी घेऊन आलोय नारळाची बिस्किटं बनवण्याची रेसिपी. घरच्या घरी तुम्ही हि बिस्किटं सहज बनवू शकता. तुम्ही चहा, कॉफी किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही पेया सोबत ही बिस्किटं खाऊ शकता. ही एग्लेस बिस्किट रेसिपी आहे, त्यामुळे प्रत्येकजण त्याचा आनंद घेऊ शकतो. या रेसिपीसाठी तुम्हाला फक्त थोडेच साहित्य आवश्यक आहे. तुम्ही एकाच वेळी बिस्किटांचा एक मोठा बॅच बनवू शकता आणि त्यांना हवाबंद जारमध्ये ठेवू शकता जेणेकरून ते २-३ आठवडे टिकतील. जर तुम्हाला बेकरीसारख्या कुकीज घरी बेक करायच्या असतील, तर कुरकुरीत कोकोनट बिस्किट बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

नारळाची बिस्किटं बनवण्यासाठी साहित्य

१/२ कप बटर

१/२ कप सुके खोबरे

१/२ टीस्पून बेकिंग पावडर

१/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स

१/२ कप पिठीसाखर

१ कप मैदा

आवश्यकतेनुसार दूध0

नारळाची बिस्किटं कशी बनवायची?

बटर वितळवून एका भांड्यात ठेवा.

आता त्यात पिठीसाखर घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.

एक गुळगुळीत आणि मलईदार मिश्रण तयार करण्यासाठी ३-४ मिनिटे बीट करा.

आता एका भांड्यात मैदा चाळून त्यात सुके कोरडे खोबरे, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स घालून हाताने मिक्स करा.

हे मिश्रण चांगले मिसळा आणि २-४ चमचे दूध किंवा तुमच्या गरजेनुसार घाला दूध घाला. मऊ पीठ करण्यासाठी चांगले मळून घ्या.

आता पिठाचे छोटे गोळे काढून थोडे चपटे करून नारळाच्या पावडरमध्ये गुंडाळून हलके हाताने कोट करा.

बटर पेपरने झाकलेल्या बेकिंग ट्रेवर नारळाची बिस्किटं ठेवा.

त्यांना प्री-हीटेड ओव्हनमध्ये १७०°C वर १५ मिनिटे बेक करा.

नारळ कुकीज किंवा बिस्किटे आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. उरलेले पदार्थ हवाबंद भांड्यात साठवा.

Whats_app_banner