Independence Day Wishes in Marathi: १५ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी खूप खास आहे. भारत यंदा आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याने हा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात. त्यामुळे आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश शेअर करा.
उत्सव तीन रंगाचा,
आज आभाळी सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा
जिथे आहे विविधतेत एकता
सत्यमेव जयते आहे आमचा नारा
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारत देश आमचा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये
अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी
सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना धर्मासाठी जगावे,
ना धर्मासाठी मरावे,
माणुसकीच धर्म आहे या देशाचा
फक्त देशासाठीच जगावे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नको कुठलाही धर्म,
नको कुठलीही जात
नको उगाच जातीपातीच्या लढाया
धरू फक्त माणुसकीची कास
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुप, रंग, वेष, भाषा जरी आहेत अनेक,
तरी आम्ही सारे भारतीय आहोत एक...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!