Independence Day 2024 : या डिशेसने मजेदार होईल स्वातंत्र्य दिनाचा उत्सव, १५ ऑगस्टसाठी नोट करा तिरंगा रेसिपी-independence day 2024 try these tricolour recipes for 15th august celebration ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Independence Day 2024 : या डिशेसने मजेदार होईल स्वातंत्र्य दिनाचा उत्सव, १५ ऑगस्टसाठी नोट करा तिरंगा रेसिपी

Independence Day 2024 : या डिशेसने मजेदार होईल स्वातंत्र्य दिनाचा उत्सव, १५ ऑगस्टसाठी नोट करा तिरंगा रेसिपी

Aug 15, 2024 05:21 PM IST

Recipe for Independence Day: १५ ऑगस्टचा दिवस स्वातंत्र्य दिनाला समर्पित आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही या ३ तिरंगा रेसिपी बनवू शकता. पाहा या रेसिपीज

१५ ऑगस्टसाठी तिरंगा रेसिपी
१५ ऑगस्टसाठी तिरंगा रेसिपी ( freepik)

Tricolour Recipes For 15th August: स्वातंत्र्य दिनाला देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या दिवशी सर्वत्र देशभक्तीच्या रंगांची झलक पाहायला मिळते. प्रत्येक जण आपापल्या स्टाईलमध्ये हा दिवस साजरा करतो. बहुतेक लोक या दिवशी पार्टी करतात. या पार्टीची थीमही तिरंगी ठेवण्यात येते. अशा वेळी तुम्ही पदार्थही तिरंगा बनवू शकता. पार्टी न करता स्वातंत्र्याचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी तुम्ही बनवू शकता हे ३ तिरंगा पदार्थ. जाणून घ्या रेसिपी.

 

तिरंगा पुलाव

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

१ कप तांदूळ

१ चिरलेला कांदा

अर्धा कप टोमॅटो प्युरी

कोथिंबीर

हिरवी मिरची

काजू

मोहरी

मीठ

कसे बनवावे

हे बनवण्यासाठी तांदूळ धुवून पाण्यात उकळावा. शिजल्यानंतर हा भात तीन भागांत वाटून घ्या. एक भाग टोमॅटो प्युरीमध्ये घालावा. दुसरा भाग कोथिंबीर, हिरवी मिरची आणि काजू च्या पेस्टमध्ये शिजवून घ्या आणि तिसरा भाग तसाच ठेवा. लक्षात ठेवा की प्युरीसह तडका देताना तुम्ही खडा मसाला आणि काही मसाले घालू शकता. तुमचा तिरंगा पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

तिरंगी इडली

ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

२ कप इडली पीठ

१/४ कप पालक प्युरी

लाल तिखट

गन पावडर

१ टेबलस्पून तूप

कसे बनवावे

हे तयार करण्यासाठी इडली बॅटरचे ३ भाग करा. एका भागात पालक प्युरी, दुसऱ्या भागात गन पावडर आणि लाल तिखट घालून तिसरा भाग असाच राहू द्या. एक भाग केशरी बनवण्यासाठी तुम्ही गाजर प्युरी देखील वापरू शकता. इडली बनवण्यासाठी स्टीमरला तूपाने ग्रीस करून त्यात पीठ घालावे. हे आता वाफेवर शिजवा. तुमची तिरंगी इडली वाफवून तयार आहे.

तिरंगा ढोकला

हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे

१ वाटी ढोकळ्याचे बॅटर

१/२ कप गाजर प्युरी

१/२ कप पालक प्युरी

साखर व चवीनुसार मीठ

१ चमचा बेकिंग सोडा

मोहरी, हिंग, हिरवी मिरची, लिंबाचा रस

कसा बनवावा

ढोकळा बनवण्यासाठी दह्याबरोबर बेसन मिक्स करा. नंतर ढोकळ्याचे पीठ ३ भागांत वाटून घ्या. मग एका भागात गाजर प्युरी, दुसऱ्या भागात पालक प्युरी घाला आणि तिसऱ्या भागात काहीही टाकू नका. सर्व भागांमध्ये थोडी साखर आणि बेकिंग सोडा घाला. स्टीमरमध्ये बॅटर घाला. प्रथम केशरी नंतर पांढरे आणि हिरवे पीठ घाला. काही मिनिटे वाफवून घ्या. आता त्यावर मोहरी, हिंग, हिरवी मिरची, पाणी, मीठ आणि साखरेपासून बनवलेला तडका घालून सर्व्ह करावे.

विभाग