Independence Day 2024: या खास तिरंगा पदार्थांनी स्वातंत्र्य दिन बनवा आणखी खास! झटपट तयार होते रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Independence Day 2024: या खास तिरंगा पदार्थांनी स्वातंत्र्य दिन बनवा आणखी खास! झटपट तयार होते रेसिपी

Independence Day 2024: या खास तिरंगा पदार्थांनी स्वातंत्र्य दिन बनवा आणखी खास! झटपट तयार होते रेसिपी

Published Aug 10, 2024 06:29 PM IST

Independence Day Recipe: १५ ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्य दिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही घरी हे तिरंगा पदार्थ बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

तिरंगा पदार्थ
तिरंगा पदार्थ

Tricolour or Tiranga Recipe: जेव्हा जेव्हा एखादी चांगली संधी येते, तेव्हा सर्वप्रथम जेवणाकडे लक्ष दिले जाते. काही दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्य दिनाला आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही स्पेशल पदार्थ बनवू शकता. देशाच्या स्वातंत्र्य दिनाला तुम्ही तुमच्या किचनमध्ये तिरंगा पदार्थ बनवून देशाप्रती असलेले प्रेम, आदर व्यक्त करू शकता. तुम्ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला तिरंगा पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर या रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तिरंगा नूडल्स आणि तिरंगा बर्फी सहज बनवू शकता. विशेष म्हणजे हे लहान मुलांपासून मोठ्यांना सुद्धा आवडेल. चला तर मग जाणून घ्या स्वातंत्र्य दिनासाठी खास तिरंगा पदार्थांची रेसिपी.

तिरंगा नूडल्स

साहित्य

- २ कप उकडलेले नूडल्स

- १/२ कप किसलेले गाजर

- पाव वाटी उकडलेले वाटाणे

- २ टीस्पून पालक पेस्ट

- २ कांदे चिरलेले

- १ चिरलेली हिरवी मिरची

- २ ते ३ टीस्पून तेल

- १ टीस्पून काळी मिरी पावडर

- मीठ चवीनुसार

कृती

सर्वप्रथम उकडलेले नूडल्स तीन भागांत वाटून घ्या. वाटाणा आणि पालकची पेस्ट तयार करा. आता एका कढईत तेल घालून त्यात थोडा कांदा परतून घ्या. नूडल्सचा एक भाग घाला आणि त्यात काळी मिरी पावडर आणि मीठ घाला. हे चांगले मिक्स करा. आता हे कढईतून काढून प्लेटमध्ये ठेवा. आता नूडल्सचा दुसरा भाग बनवण्यासाठी कांदा भाजून घ्या आणि त्यात गाजरची पेस्ट टाका. यात काळी मिरी आणि मीठ टाकून मिक्स करा. हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच प्रमाणे नूडल्सचा तिसरा भागही तयार करायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यात मटार आणि पालकाची पेस्ट घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. आता त्यात हिरवी मिरची आणि नूडल्स, काळी मिरी, मीठ घालून मिक्स करा. आता तयार केलेले तीन नूडल्स एका प्लेटवर ठेवून तिरंग्यासारखे सजवा.

तिरंगा बर्फी

साहित्य

- ताजा खवा किंवा मावा - ४०० ग्रॅम

- साखर - ३५० ग्रॅम

- पनीर - १५० ग्रॅम

- १/२ चमचा वेलची पूड

- गोड पिवळा आणि हिरवा रंग

- चांदीचे वर्क

कृती

प्रथम खवा आणि पनीर किसून ठेवा. आता त्यात साखर घाला. यानंतर मध्यम आचेवर कढईत शिजू द्या. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. आता तयार केलेले मिश्रण तीन समान भागांमध्ये वाटून घ्या. पहिला भाग पांढरा ठेवा. दुसऱ्या भागात गोड पिवळा आणि तिसऱ्या भागात हिरवा रंग मिक्स करा. हलक्या हाताने जाड लाटून घ्या. आता खाली हिरवा, नंतर वर पांढरा आणि त्यावर केशरी रंगाची लेअर ठेवून बर्फी तयार करा. तुम्हाला आवडत असेल तर वर हलक्या हाताने चांदाची वर्क लावा. नको असेल तर स्किप करू शकता. आता चौकोनी आकारात किंवा आवडीच्या आकारात कापून घ्या. तुमची तिरंगा बर्फी तयार आहे.

Whats_app_banner