77th or 78th Independence Day: भारताचा स्वातंत्र्य दिवस हा देशभरात उत्साहात साजरा केला जातो. मात्र दरवर्षी या दिवसाच्या संदर्भात एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो. तो म्हणजे, आपण या वर्षी ७७ वा की ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत? या गोंधळामागे काय कारण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर येथे जाणून घ्या
१५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. त्या दिवसाची पहिली वर्धापन तारीख म्हणजे १५ ऑगस्ट, १९४८. त्यानंतर दरवर्षी या दिवसाची वर्धापन तारीख आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा क्रम सुरू झाला.
आपण सर्वजण १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, हे खरे आहे. पण या दिवसाची वर्धापन तारीख आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा क्रम वेगवेगळा असतो. यामुळे अनेकदा गोंधळ उद्भवतो. उदाहरणार्थ यंदा २०२४ मध्ये आपण स्वातंत्र्याची ७७ वा वर्धापन दिन साजरा करत असलो, तरी हा ७८ वा स्वातंत्र्य दिवस आहे. याचे कारण असे की, पहिली वर्धापन तारीख घटना घडल्यानंतर एक वर्षानंतर येते. याचा अर्थ असा की, पहिला स्वातंत्र्य दिवस १९४७ मध्ये साजरा झाला आणि त्याची पहिली वर्धापन तारीख १९४८ मध्ये आली. त्यानंतर दरवर्षी एका वर्षाने वाढ होत गेली.
सोप्या शब्दात सांगायचे तर, आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, तो म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची आठवण करून घेणे. तर वर्धापन तारीख म्हणजे त्या दिवसाची वर्षपूर्ती साजरी करणे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे यामध्ये थोडा गोंधळ होणे स्वाभाविक आहे.
स्वातंत्र्य दिवस हा देशभक्तीचा आणि एकतेचा सण आहे. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला शतशः नमन करतो. या गोंधळाच्या मागील कारण समजून घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे कळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)