Independence day 2024: १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. यादिवशी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो होतो. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचे प्रचंड महत्व आहे. आजचा दिवस विविधप्रकारे साजरा केला जातो शाळेमध्येसुद्धा मुलांमध्ये स्वातंत्र्य दिनाची उत्सुकता लागून असते. शाळेमध्ये मुलांमध्ये देशप्रेम वाढीस लागावा, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत मुलाना माहिती व्हावी, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये निबंध आणि भाषणाचा आवर्जून समावेश होतो. प्रत्येक पालक आपल्या मुलांना यामध्ये भाग घेण्यास आनंदाने तयार करतो. परंतु बऱ्याचवेळा लहान मुलांसाठी नेमका निबंध कसा दहावा? कोणते मुद्दे घ्यावे याबाबत संभ्रम असतो. तर आज आपनं याबाबतच जाणून घेणार आहोत. जेणेकरून सोप्या-सुटसुटीत भाषेत तुमच्या मुलांना निबंध लिहिता येईल.
तुम्हीसुद्धा स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठीमध्ये एक प्रभावी आणि हृदयस्पर्शी निबंध लिहिण्याचा विचार करत असाल, तर येथे दिलेल्या मुद्द्यांतून तुम्ही निबंध कसा लिहावा याचा नेमका अंदाज येईल. शिवाय या प्रकारे निबंध लिहिल्यास १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगले गुण मिळवून बक्षिसे देखील जिंकता येतील. स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, तुम्ही नेमके कशाप्रकारे निबंध लिहू शकता.
१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. या दिवशी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि जगाने प्रथमच भारताला एक देश म्हणून मान्यता दिली. स्वातंत्र्यदिन ही केवळ ऐतिहासिक घटना नसून, हा दिवस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत. आणि देशाची एकता आणि अखंडतेसाठी प्रयत्नशील राहून एकत्रित राहण्याची प्रेरणाही देतो.
स्वातंत्र्य हा केवळ एक दिवसाचा लढा नसून त्यासाठी तब्बल १५० वर्षांचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रवासात जिवाची पर्वा न करता असंख्य स्वातंत्र्यसैनिक लढले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, जवाहरलाल नेहरू, आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या नेत्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध धाडसाने आवाज उठवला. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. तर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांसारखे क्रांतिकारक अधिक आक्रमक आणि प्रतिकारात्मक दृष्टिकोन घेऊन पुढे आले. या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आज स्वातंत्र्य दिनाचा उत्सव प्रत्येक भारतीयांना साजरा करता येऊ लागला.
१५ ऑगस्ट हा दिवस भारत सरकार आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी सकाळी, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून स्वातंत्र्याची घोषणा केली तेव्हापासून ही अर्थातच १९४७ पासून ही परंपरा सुरू आहे. ध्वजारोहण समारंभ हा एक प्रमुख राष्ट्रीय उत्सव आहे. ज्यामध्ये देशाच्या सशस्त्र सेना, शाळा आणि अनेक संघटनांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि परेड आयोजित केल्या जातात. यादिवशी जिलेबीसारखा गॉड पदार्थ वाटून सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात.