Independence Day Fashion : १५ ऑगस्टला तुमचा एथनिक लुक बनवा आणखी खास, सर्वांमध्ये दिसाल उठून-independence day 2024 follow these tips to make your ethnic look special on 15th august ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Independence Day Fashion : १५ ऑगस्टला तुमचा एथनिक लुक बनवा आणखी खास, सर्वांमध्ये दिसाल उठून

Independence Day Fashion : १५ ऑगस्टला तुमचा एथनिक लुक बनवा आणखी खास, सर्वांमध्ये दिसाल उठून

Aug 15, 2024 05:23 PM IST

Fashion Tips for 15th August: प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. काही लोक तिरंगा रंगातील कपडे घालून हा दिवस साजरा करतात. अशा वेळी तुमचा एथनिक लुक खास करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

स्वातंत्र्य दिनासाठी फॅशन टिप्स
स्वातंत्र्य दिनासाठी फॅशन टिप्स

Tips to Make Ethnic Look Special: १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरात दरवर्षी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. या दिवशी बहुतांश स्त्रिया एथनिक वियर घालून तयार होतात. या निमित्ताने तुम्हालाही सर्वांपेक्षा वेगळं आणि खास दिसायचं असेल तर काही स्टायलिंग टिप्सचा अवलंब करा. या टिप्स फॉलो करून तुम्ही तिरंगा थीममध्ये सहज सामील होऊ शकाल.

तिरंगा दुपट्टा घ्या

आपला लूक खास बनवण्यासाठी तुम्ही तिरंगा दुपट्टा घेऊ शकता. पांढऱ्या रंगाच्या सूटसोबत असा दुपट्टा खूप छान दिसतो. लुक स्टायलिश करण्यासाठी तुम्ही शरारा सूट घालू शकता. तुम्हाला हवं असेल तर केशरी दुपट्ट्यासोबत पांढरा कुर्ता आणि हिरवी पँट कॅरी केली जाऊ शकते.

तिरंगी बांगड्या

स्टायलिश लुकसाठी हातात तिरंगा रंगाच्या बांगड्या घाला. जर तुम्ही साडी नेसली असेल तर एकाच हातात भरपूर बांगड्या घालू शकतात. अशा प्रकारे लुक एकदम क्लासी दिसतो. लक्षात ठेवा की आपण केशर, पांढऱ्या आणि हिरव्या बांगड्यांचा सेट तयार करावा.

तिरंगा रिबन

जर तुमच्याकडे तिरंगी रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही सिंगल रंगाचे कपडे घालू शकता. केशरी, पांढरा किंवा हिरवा असा एकाच रंगाचे आउटफिट घालू शकता. ते घातल्यानंतर तुम्ही तिरंगा थीममध्ये राहण्यासाठी रिबनचा वापर करू शकता. या रिबनचे फूल तयार करून कुर्त्यावर लावा किंवा मनगटावर रिबन लावा.

तिरंगा बेल्ट

साडी नेणे आवडत असेल तर ती बेल्टने स्टाइल करा. हा बेल्ट तिरंगा रंगाचे घ्या. हे तुमच्या थीमला मॅच करेल. तसेच तुम्हाला स्टायलिश लुकही मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)