
Tiranga Idli Recipe: १५ ऑगस्ट असो वा प्रजासत्ताक दिन, दोन्ही प्रसंगी देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो. कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत तिरंग्याचा सुगंध आणि रंग दिसतो. या दिवसात प्रत्येक माणसाला देशभक्तीच्या रंगात डुंबल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही हा स्वातंत्र्यदिन खास बनवायाचा असेल तर एक खास डिश बनवू शकता. नाश्त्यामध्ये तिरंग्याच्या रंगाची डिश बनवू शकता. तुम्ही टेस्टी आणि हेल्दी तिरंगा इडली बनवू शकता. ही खास डिश बनवण्यासाठी जाणून घ्या त्याची साहित्य आणि रेसिपी.
तिरंगा इडली बनवण्यासाठी साहित्य
१७५ ग्रॅम इडली तांदूळ
७५ ग्रॅम धुतलेली उडीद डाळ
१० ग्रॅम मीठ
१५ ग्रॅम कॅरेट प्युरी
२५ ग्रॅम उकडलेली पालक प्युरी
तिरंगा इडली कशी बनवायची?
तिरंगा इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ आणि तांदूळ २ तास आधी भिजवल्यानंतर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा.
आता हे पिठ ग्राइंडरमधून काढा आणि १२ तास तसेच ठेवा.
या पिठात फुलल्यावर पिठाचे ३ भाग करत वेगेवेगळ्या भांड्यात काढून घ्या.
एका भागात गाजर प्युरी आणि दुसऱ्या भागात पालक प्युरी घाला. यामुळे इडलीला केशरी आणि हिरवा रंग येईल.
आता इडलीच्या साच्यात लाल केशरी, नंतर पांढरा आणि हिरव्या रंगाचे पीठ घाला.
सुमारे २० मिनिटे ते वाफवून घ्या.
इडली बनवल्यानंतर नारळाची चटणी किंवा हिरव्या कोथिंबीर चटणीबरोबर सर्व्ह करा.
संबंधित बातम्या
