Cause of Bad Cholesterol: जर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होऊ लागतात. ज्यामुळे हृदयविकार होतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण बऱ्याचदा जंकफूड, रिफाइंड कार्ब, तेलकट अन्न आणि कमी शारीरिक व्यायाम मानले जाते. परंतु बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण केवळ खराब आहार, कमी शारीरिक श्रम, तणाव किंवा धूम्रपान नाही तर नियासिन नावाचा एक विशेष प्रकारचा व्हिटॅमिन बी ३ देखील यासाठी जबाबदार आहे. सोशल मीडियावर डॉ. स्मिता सांगतात की, या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात चांगले कोलेस्टेरॉल व्यवस्थित तयार होऊ शकत नाही. म्हणूनच, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी ३ ची कमतरता पूर्ण करणे देखील आवश्यक आहे.
- खरं तर व्हिटॅमिन बी ३ म्हणजेच नियासिन शरीरात तयार होणारे एंजाइम यकृतापर्यंत नेण्यास मदत करते. ज्यामुळे चांगले कोलेस्टेरॉल तयार होते. यासोबतच नियासिन कमी घनतेचे लिपोप्रोटीन आणि ट्रायग्लिसेराइड कमी करण्यास मदत करते.
- नियासिन यकृतात एलडीएल तयार होण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही.
- व्हिटॅमिन बी ३ एचडीएल वाढविण्यास मदत करते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. व्हिटॅमिन बी ३ अतिरिक्त थरासारखे कार्य करते. जे रक्तवाहिन्यांचे खराब कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करते.
- ट्रायग्लिसेराइड हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी धोकादायक आहे. व्हिटॅमिन बी ३ रक्तात या चरबीचे प्रमाण वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
- रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग म्हणजेच चरबी जमा होण्यापासून रोखते. ज्यामुळे हार्ट स्ट्रोक आणि अटॅकचा धोका कमी होतो.
योग्य जीवनशैली आणि आहारानंतरही लिपिड प्रोफाइल योग्य नसेल आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होत नसेल तर व्हिटॅमिन बी ३ सप्लीमेंट्सचा समावेश करा. नियासिन सप्लीमेंट्स बाजारात उपलब्ध असले तरी आहारात या गोष्टींचा समावेश करून व्हिटॅमिन बी ३ चे प्रमाणही वाढवता येते.
- चिकन
- टुना
- टर्की
- मशरूम
- ब्राउन राईस
- शेंगदाणे
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)