Child Health Care: लहानपणापासूनच मुलांना काही सवयी लावायला हव्यात. त्यांच्या आरोग्याशी निगडीत चांगल्या सवयी लावल्या गेल्या तर त्यांना फार फायदा होतो. मुलांसाठी एक खास दिनक्रम असायला हवा. ज्यामुळे ते नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. आजकालच्या पालकांना सर्वात मोठी चिंता ही आहे की त्यांचे मूल शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि तंदुरुस्त तसेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे. यासाठी मुलांना काही सवयी लावणे करणे गरजेचे आहे. मुलांना रोज काही योगासने करायला लावावीत. यामुळे मुलांचे मेंदू डेव्हलोप होण्यास मदत करते. मुले अनेकदा तक्रार करतात की ते वाचलेले विसरतात. अशा परिस्थितीत, मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी, त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात काही योगासने करायला लावू शकतात, ज्यामुळे ते शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहतील.
मुलांना नियमितपणे बालसनाचा सराव करा. यामुळे मुलांचे मेंटल हेल्थ योग्य राहते. या योगामुळे त्यांचा तणाव दूर होईल आणि मन शांत होईल. अशावेळी त्यांचं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
मुलांना रोज वृक्षासन आणि ताडासन करायला लावा. हे फारच सोपी योगासने आहेत. ही आसने त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताडासन आणि वृक्षासन केल्याने मुलांचे स्नायू बळकट होतातच पण मानसिक संतुलन राखण्यासही मदत होते. मुलांची उंची वाढवण्यासाठीही ताडासन प्रभावी मानले जाते.
मुलाला पद्मासनाचा सराव करायाला लावा. त्यांना हळूहळू या योगासनांची सवय होईल. या आसनामुळे मेंदूला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हे आसन स्थिरता आणते आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.
सर्वांगासनाचा सराव रोज केल्यास झोप उत्तम येते. यासोबतच हे योग आसन रक्ताभिसरण सुधारते आणि डोक्याच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह सुधारते, जे मेंदूसाठी फायदेशीर आहे. यामुळे मुले अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या