मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Important Lessons Your Kids Can Learn From Lord Ganesha On Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाकडून मुलांना शिकता येतील या गोष्टी, जीवनात येईल सकारात्मकता

मुलांना गणपती बाप्पाकडून शिकता येणाऱ्या गोष्टी
मुलांना गणपती बाप्पाकडून शिकता येणाऱ्या गोष्टी (Freepik)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Sep 19, 2023 10:39 PM IST

Ganpati Festival 2023: आज देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पालक आपल्या मुलांना गणपती बाप्पाचे हे गुण शिकवू शकतात.

Lessons Kids Can Learn From Lord Ganesha: गणेश चतुर्थी आज म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. देशभर विविध पद्धतीने या दिवसाचा जल्लोष पहायला मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव विविध पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक मंडळे असो वा घरी सर्वत्र बाप्पाची सुंदर मूर्ती पहायला मिळते आणि गाणी ऐकायला मिळतात. गणपती बाप्पाकडून तुम्हाला जीवनातील अनेक पैलूंशी संबंधित धडे देखील मिळतात, ज्याबद्दल तुम्ही तुमच्या मुलांना जरूर सांगावे. यातून मुले नक्कीच जीवनाचे धडे घेतील.

ट्रेंडिंग न्यूज

आई-वडील हे जग आहेत

मुले गणपती बाप्पाकडून कुटूंबाला प्रेम करायला शिकू शकतात. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिक यांना पृथ्वीभोवती तीन वेळा प्रदक्षिणा मारण्याची सूचना केली. हे ऐकून भगवान कार्तिक ताबडतोब आव्हान पूर्ण करण्यासाठी गेले. पण भगवान गणेश चतुर आणि बुद्धीमान होते म्हणून त्यांनी आपल्या पालकांना तीन वेळा प्रदक्षिणा घातल्या आणि दावा केला की त्यांचे आई-वडील त्यांचे संपूर्ण जग आहेत. या घटनेतून मुले जीवनाचे महत्त्वाचे धडे घेऊ शकतात. मुले हे शिकू शकतात की त्यांच्या पालकांपेक्षा कोणीही मोठा नाही आणि म्हणूनच त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे.

विनम्र असणे

प्रत्येकाला माहित आहे की भगवान गणेश आपला सोबती म्हणून उंदीर ठेवतात. यावरून मुलांना समजू शकते की त्यांनी अगदी लहान प्राणी आणि गरीब व्यक्तींचाही आदर केला पाहिजे आणि प्रत्येकाप्रती दया दाखवली पाहिजे.

हार मानू नका

जेव्हा ऋषी व्यास भगवान गणेशाला महाभारताची कथा सांगत होते तेव्हा त्यांच्या लेखणीतील शाई सुकली. तेव्हा ऋषींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गणेशाने उर्वरित कथा लिहिण्यासाठी स्वतःचा दात तोडला. या कथेतून मुलांना शिकता येते की आयुष्यात कधीच हार मानू नये. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींतील प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)