Hair Growth Tips: जवळजवळ प्रत्येक स्त्रीला, मुलीला लांब आणि दाट केस हवे असतात. पण बदलेल्या जीवनशैलीमुळे असे केस राहणे मुश्किल आहे. फार कमी लोक असतात ज्यांचे केस सहजपणे लांब आणि दाट होतात. पण आजकालच्या बिघडलेल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस खराब होत आहेत. अनेकांच्या तर केसांची वाढही नीट होत नाही. या कारणांमुळे, लांब आणि दाट केस असणे हे एक प्रकारचे स्वप्न बनले आहे. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. घरगुती सोप्पे उपाय करून तुम्ही लांब आणि दाट केस मिळवू शकता. चला जाणून घेऊयात की कोणत्या गोष्टी तुमच्या केसांना जिवंत ठेवण्यास मदत करतील आणि केसांना लांब आणि दाट बनवतील.
अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. हे सर्व केसांसाठी आवश्यक असतात. हे केसांना मुळांपासून मजबूत करतात आणि त्यांना गळण्यापासून रोखतात. हे नवीन केस वाढण्यास आणि केस दाट होण्यास देखील मदत करू शकते.
ऑलिव्ह ऑईल हे शरीरासाठी फारच उत्तम असते. असेच हे तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइलने केसांना दररोज शॅम्पू करा, यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि केस मजबूत होतात. म्हणजे केसांना सर्व प्रकारचे पोषण मिळते आणि केस लांब आणि मुलायम होतात.
मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये लोह आणि प्रोटीन असते. केस वाढवण्यासाठी दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये एक चमचा खोबरेल तेल घाला. आता ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावा आणि मसाज करा. लांब आणि दाट केसांसाठी हा हेअर पॅक आठवड्यातून दोनदा लावा.
कांद्याचा रस केसांसाठी वापरणे हा सर्वात जुना उपाय आहे. हा रस केसांसाठी जाणून संजीवनी असल्यासारखाच आहे. हा उपाय करण्यासाठी ५ ते ६ चमचे कांद्याचा रस दही आणि आंबट दही एकत्र मिसळून केसांच्या टाळूवर लावा. २० मिनिटे असेच ठेवा नंतर हे सौम्य शॅम्पूने धुवावे. यामुळे तुमचे केस फास्ट वाढू लागतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)