Healthy Food For Children: तुमच्या मुलाला हुशार बनवायचे असेल तर त्यांना ‘या’ गोष्टी खायला द्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Food For Children: तुमच्या मुलाला हुशार बनवायचे असेल तर त्यांना ‘या’ गोष्टी खायला द्या!

Healthy Food For Children: तुमच्या मुलाला हुशार बनवायचे असेल तर त्यांना ‘या’ गोष्टी खायला द्या!

Published Feb 15, 2023 12:03 PM IST

Child Care: आजकालच्या मुलांनाच्या खाण्यापिण्याच्या सवयी फार वेगळ्या आहेत याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

हेल्थ केअर
हेल्थ केअर (Freepik )

Parenting Tips: निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वे आढळतात. यातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार होतात. विशेषत: मुलांच्या सर्वांगीण विकासात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हालाही तुमच्या मुलाला हुशार बनवायचे असेल, तर त्यांना संतुलित आहारासोबत या गोष्टी नक्की खायला द्या.

या गोष्टी द्या खायला

> साधारणपणे मुलांना दही कमी खायला आवडते. मात्र, दही हे मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. याच्या सेवनाने पचनक्रिया निरोगी राहते. हाडे मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.

> अनेक मुलांना अंडी आवडत नाहीत. याविषयी ते म्हणतात की अंड्यांचा वास चांगला नसतो. मात्र, अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने स्मरणशक्ती वाढते. अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय इतरही अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

> मुलांना खायला रताळे जरूर द्यावेत. रताळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

> मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी, त्यांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी दूध प्यायला द्या. यासाठी मुलांना रोज एक ग्लास दूध द्यावे. आपण दुधात पूरक पदार्थ देखील जोडू शकता. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

> जर तुम्हाला तुमच्या मुलाला हुशार बनवायचे असेल तर त्यांना सुका मेवा आणि बिया खायला द्या. यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे त्वरित ऊर्जा वाढते.

> आजकालच्या मुलांना संपूर्ण धान्य खाणे आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आपण आपल्या मुलाच्या आहारात संपूर्ण धान्य समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यात सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात.

 

Whats_app_banner