मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Side Effects of Tomato: हे ५ आजार असतील तर ते कधीही खाऊ नका टोमॅटो!

Side Effects of Tomato: हे ५ आजार असतील तर ते कधीही खाऊ नका टोमॅटो!

Dec 07, 2023 06:54 PM IST

Health Care: रोजच्या स्वयंपाकात टोमॅटोचा वापर हमखास केला जातो. पण त्याचे अतिसेवन घातक ठरू शकते.

Tomatoes
Tomatoes (unsplash)

Side Effects of Tomato: टोमॅटो हा भारतीय घरातील महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय अनेक डिश पूर्ण होऊ शकत नाहीत. टोमॅटो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. याचे सेवन मोठ्या प्रमाणात फायदेशीर मानले जाते. त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक आढळतात. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सही असतात. टोमॅटो खाल्ल्यानंर अनेक मोठं मोठे आजार जसे की हृदयाशी संबंधित आजार, कर्करोग, मधुमेह, जुनाट बद्धकोष्ठता इत्यादी पासून दूर राहता येते. तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीही वाढते. पण तुम्हाला माहिती आहे का टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने विपरीत परिणाम होतात.

पोटाशी संबंधित समस्या असल्यास टाळा

टोमॅटोचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही दररोज टोमॅटो खाल्ले तर अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ शकते. पाचक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी टोमॅटोचे सेवन विषासारखे काम करते.

पोषण संबंधी असंतुलन

टोमॅटो हे पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. पण जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते विषाचे काम करते.

ट्रेंडिंग न्यूज

लघवीशी संबंधित समस्या

टोमॅटो अम्लीय भाजी आहे. त्यामुळे याचा जास्त सेवनाने लघवीमध्ये जळजळ होऊ शकते.

किडनीच्या समस्या असल्यास टाळा

तज्ज्ञांच्या मते टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित कोणतीही समस्या आहे त्यांनी टोमॅटोचे सेवन टाळावे. यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel