मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? हे घरगुती उपाय करा!

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? हे घरगुती उपाय करा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2023 02:02 PM IST

Home Remedies for Pigmentation: बदलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत.

Pigmentation
Pigmentation (Freepik)

Clean and Clear Skin: क्लीन आणि चमकदार त्वचा प्रत्येकाला हवी असते. पण आजच्या काळात असे खूप कमी लोक असतात ज्यांना अशी त्वचा मिळते. आजकाल लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. कपाळावर काळपटपणा होणे ही फार कॉमन समस्या झाली आहे. काहींचा चेहरा स्वच्छ असतो परंतु त्यांच्या कपाळावर खूप टॅनिंग असते. टॅनिंगमुळे चेहरा आणि कपाळाचा रंग वेगळा दिसतो. अशा परिस्थितीत, आपला लूक पूर्णच खराब दिसतो. जर तुम्हीही या समस्येतून जात असाल तर आम्ही तुमच्यासाठी हा उत्तम उपाय घेऊन आलो आहोत. घरगुती उपायांनी तुमचे कपाळ कसे स्वच्छ करावे हे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

पिगमेंटेशन का होते?

जर तुमच्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशन किंवा फ्रिकल्स असतील तर याचा अर्थ तुमच्या मेलेनिनची पातळी वाढली आहे. त्वचेच्या वरच्या थराला मेलेनिन म्हणतात, ते सूर्याच्या तीव्र किरणांमधून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते.

हे उपाय करा

> बदामाचे तेल

बदामाच्या तेलात दूध आणि मध मिसळून पेस्ट बनवा. आता ते तुमच्या कपाळावर लावा. हे कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

> हळद गुणकारी

हळदी तर खूप गुणकारी असते. कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि आता ही पेस्ट कपाळाच्या पिगमेंटेड भागात लावा. यामुळे टॅनिंगची समस्या हळूहळू दूर होईल.

> बटाट्याचा रस

बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा, आता प्रभावित भागावर लावा. बटाट्याचा रस लावल्याने कपाळावरील काळे हळूहळू दूर होतात.

> काकडी दूर करते

पोषक तत्वांनी युक्त काकडी पिगमेंटेशन सहज दूर करू शकते. काकडीचे तुकडे करून कपाळावर मसाज करा. ३० मिनिटे चेहरा असाच राहू द्या. आता पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग