मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: या ४ गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला होईल पश्चात्ताप!

Chanakya Niti: या ४ गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला होईल पश्चात्ताप!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 06, 2024 08:43 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti in Marathi
Chanakya Niti in Marathi

Chanakya Niti: चाणक्य हे फार मोठे राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि प्राचीन भारताचे तत्वज्ञानी गुरू होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावानेही ओळखले जाते. त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चाणक्याने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना त्यांची धोरणे म्हणून ओळखले जाते. त्याच्या धोरणांमध्ये इतके सामर्थ्य आहे की ते आजही उपयोगी येतात. एखादी व्यक्ती कितीही वाईट परिस्थितीत सापडली तरी त्यांची धोरणे त्याला त्वरित मार्ग दाखवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला चाणक्याच्या अशाच एका धोरणाबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये त्यांनी कोणतेही काम करण्यापूर्वी काय लक्षात घ्यावे याबद्दल एक इशारा दिला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात...

कः कालः कानि मित्राणि को देशः को व्ययागमोः।

कस्याहं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुहुः॥

चाणक्य आपल्या धोरणात सांगतात की, कोणती वेळ योग्य आहे, माझे खरे मित्र कोण आहेत, मी जिथे राहतो तो देश आणि ठिकाण कसे आहे आणि माझा खर्च आणि उत्पन्न काय आहे हे आपण आधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. माणसाने या सर्व गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. ते म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तरच एखाद्या कामात पुढे जायला हवे. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की या सर्व गोष्टी आपल्यानुसार असतील तर एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मित्र

माणसाचे खरे मित्र त्याच्या यशात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे आयुष्यात चांगले मित्र असणे गरजेचे आहे. आयुष्यात चांगल्या मित्रांचे योगदान मिळाले तर माणूस सहज यशाच्या पायऱ्या चढतो. त्यामुळे खरे मित्र ओळखणे फार महत्वाचे आहे.

उत्पन्न आणि खर्चाचा विचार

चाणक्य हे कुशल अर्थतज्ञ होते. याचमुळे त्यांनी एखाद्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जास्त नसेल आणि त्याचा खर्च जास्त असेल तर त्याची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. त्यामुळे व्यक्तीने उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला पाहिजे.

वेळेचा विचार

आचार्य चाणक्य म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी वेळेचा विचार केला पाहिजे. कोणतेही काम वेळेवर केले गेले नाही तर शेवटी अपयश येते. कोणत्याही कामाच्या यशात वेळेचा मोठा वाटा असतो.

ठिकांणांचा विचार करा

चाणक्याच्या मते, अशा ठिकाणी राहायला हवे, जिथे माणसाला सहज रोजगार मिळू शकेल. त्यामुळे राहण्याआधी त्या जागेचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel