Heatstroke: उष्‍माघाताचा त्रास होत असेल तर त्‍वरित करा हे उपाय!-if you are suffering from heatstroke try this quick remedy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heatstroke: उष्‍माघाताचा त्रास होत असेल तर त्‍वरित करा हे उपाय!

Heatstroke: उष्‍माघाताचा त्रास होत असेल तर त्‍वरित करा हे उपाय!

Apr 03, 2024 02:32 PM IST

Heatstroke Remedies: वाढलेल्या गरम वातावरणामुळे उष्‍माघाताच्या केसेस वाढत आहेत. यावेळी नक्की काय करावं याबद्दल तज्ञांकडून जाणून घ्या.

Quick remedy on heatstroke
Quick remedy on heatstroke (freepik)

Summer Health Care: उष्‍माघात हा उष्‍णतेशी संबंधित सर्वात चिंताजनक आजार आहे. शरीर तापमानावर नियंत्रण ठेवण्‍यास अक्षम होते तेव्‍हा हा आजार होतो, बहुतेक वेळा त्‍यांचे प्रतिकूल परिणाम दिसून येतात. उष्‍माघातामध्‍ये शरीराची स्‍वेटिंग सिस्‍टम (घाम येण्‍याची यंत्रणा) निकामी होते, ज्‍यामुळे शरीराला थंडावा मिळण्‍यामध्‍ये अडथळा येतो. उष्‍माघातादरम्‍यान १० ते १५ मिनिटांमध्‍ये शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेड किंवा त्‍यापेक्षा अधिक होऊ शकते. अधिक काळापर्यंत उच्‍च तापमानात राहणाऱ्या किंवा उष्‍ण वातावरणात अधिक प्रमाणात शारीरिक व्‍यायाम करणाऱ्या व्‍यक्‍तींना उष्‍माघात होण्‍याची शक्‍यता असते. त्‍वरित वैद्यकीय हस्‍तक्षेप न केल्‍यास उष्‍माघातामुळे आरोग्‍यविषयक गुंतागूंती, कायमस्वरूपी अपंगत्‍व येण्‍यासोबत मृत्‍यू देखील होऊ शकतो. याबद्दल अधिक जाणून घ्या वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनच्‍या संचालक डॉ. फराह इंगळे यांच्याकडून...

उष्‍माघात दोन प्रकारचे आहेत:

एक्‍झर्शनल: या प्रकाराचा शारीरिकदृष्‍ट्या तंदुरूस्‍त व्‍यक्‍तींसह अधिक प्रमाणात शारीरिक क्रियाकलापांमध्‍ये समाविष्‍ट असलेले अॅथलीट्स, कामगार यांच्‍यावर परिणाम होऊ शकतो.

नॉन एक्‍झर्शनल: या प्रकाराचा वृद्ध व्‍यक्‍ती, तसेच लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, स्मृतिभ्रंश आणि अल्‍कोहोलिझम अशा आरोग्‍यविषयक आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना हलक्‍या सवरूपात शारीरिक व्‍यायाम करताना देखील त्रास होऊ शकतो.

उष्‍माघाताची लक्षणे:

 उष्‍ण, कोरडी त्‍वचा किंवा घाम न येणे

 शरीराचे असामान्‍य उच्‍च तापमान

 गोंधळून जाणे

 बोलण्‍यास न होणे

 चेतना नष्‍ट होणे

 सीझर्स

 डोकेदुखी

 चक्‍कर येणे

 हृदयाची धडधड झपाट्याने होणे किंवा वाढणे

व्‍यक्‍तीला उष्‍माघाताचा त्रास होत असेल तर करावयाचे त्‍वरित उपाय:

 > आपत्कालीन वैद्यकीय मदत मिळवा

> व्‍यक्‍तीकडे दुर्लक्ष करू नका, आपत्‍कालीन वैद्यकीय सेवा येईपर्यंत त्‍याच्‍यासोबत/तिच्‍यासोबत राहा.

> व्‍यक्‍तीला सावली व थंडावा असलेल्‍या ठिकाणी न्‍या आणि जॅकेट्स व स्‍कार्फ यांसारखे अतिरिक्‍त कपडे काढा.

> व्‍यक्‍तीला त्‍वरित थंड वाटण्‍यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा:

> त्‍वचा ओली करण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर हलक्‍या प्रमाणात पाणी शिंपडा.

> त्‍वचेवर थंड ओला कापड ठेवा.

> डोके, मान, काख व मांडीवर आइस पॅक ठेवा.

> शक्‍य असल्‍यास त्‍यांना थंड पाणी असलेल्‍या बॅच टबमध्‍ये ठेवा.

> पंखा किंवा एसीसह आसपासच्‍या वातावरणात हवा प्रसारित करा.

गंभीर स्थितीत गुंतागूंत व्यवस्थापित करण्यासाठी इंट्राव्हेनस फ्लूईड्स आणि औषधे यांसारख्या अतिरिक्त उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असू शकते. उष्माघाताचा संशय असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

या सीझनमध्‍ये तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढत आहे. गरम हवामानात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, जसे हायड्रेटेड राहणे, हलके व सैल-फिटिंग सुती कपडे घालणे, गर्दीच्या वेळेस बाहेर जाणे टाळणे आणि शक्‍य असल्‍यास सावली किंवा वातानुकूलनाचा आसरा घेणे.