चार धाम यात्रेला जाण्याचे सर्वांचे स्वप्न असते. १० मे पासून चार धाम यात्रेचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या यात्रेला जाण्यासाठी अनेक भाविक तयारी करत आहेत. पण या यात्रेला जाताना अनेकांची प्रकृती अचानक बिघते. त्यामुळे काहींना भीता वाटते की या यात्रेसाठी आपण फिट आहोत की नाही. अशावेळी प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही फिट आहात की नाही हे घरच्या तपासून पाहा. जाणून घ्या कसे...
चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले असले तरीही अनेकांना डोंगरावर चालताना प्रकृती खालावत असल्याचे जाणवते. अचानक प्रकृती बिघडू नये यासाठी जाण्यापूर्वी तुम्ही किती तंदुरुस्त आहात हे जाणून घेण्यासाठी काय करावे चला पाहूया...
वाचा: डेंग्यू झाल्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाली आहे? मग 'हे' पदार्थ नक्की खा
डॉक्टर अनेकांना सल्ला देतात की डोंगरावर जाण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. काही चाचण्या आहेत ज्या तुम्ही वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने घरच्या घरी करू शकता. सर्वप्रथम तुम्ही तुमचा रक्तदाब तपासायला हवा. जर तुमचे बीपी ११४.५ ते ७५.५ दरम्यान असेल तर ते सामान्य आहे, परंतु जर ते यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. जर बीपी जास्त किंवा कमी असेल तर तुम्ही डोंगरावर जाण्याची हिंमत करु नका. असे केल्याने उंचीवर हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका असतो. त्यामुळे या नक्की तपासून पाहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
वाचा: गर्दीपासून लांब कुठे तरी शांत ठिकाणी जायचे? मग ठाण्याजवळील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
जर तुमच्या घरी पल्स ऑक्सिमीटर असेल तर ऑक्सिजनची पातळी चेक करुन पाहा. तुमची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा कमी असेल तर तुम्ही प्रवास करु शकत नाही. त्यामुळे जास्त उंचीच्या भागात गेल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. त्यामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे ऑक्सिजन पातळी तपासा.
चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी तुमच्या शरीरातील साखरेची पातळी तपासून पाहा. डोंगरांवर चालताना तुमची साखरेची पातळी कधीही १५० पेक्षा जास्त नसावी. जर जास्त असेल तर तुम्ही यात्रेसाठी जाणे टाळा.
वाचा: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा
करोना काळात तुम्हाला जर संसर्ग झाला असेल तर यात्रेला जाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच प्रवास करा. कारण करोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. काही लोकांना फुफ्फुसाच्या संसर्गाची समस्या आहे. फुफ्फुसे मजबूत राहत नाहीत. डोंगराळ भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याने अशा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोकाही असतो.तुम्ही जर डोंगरावर फिरायला जात असाल तर तुमच्यासोबत फर्स्ट एड बॉक्स नक्कीच ठेवा.
संबंधित बातम्या