Nutrients in Jaggery: शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळासोबत खा ही गोष्ट!-if there is lack of blood in the body eat this thing with jaggery ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Nutrients in Jaggery: शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळासोबत खा ही गोष्ट!

Nutrients in Jaggery: शरीरात रक्ताची कमतरता असेल तर गुळासोबत खा ही गोष्ट!

Dec 06, 2023 01:19 PM IST

Jaggery Benefits: गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि काही प्रमाणात जस्त आणि तांबे असतात.

Jaggery Benefits
Jaggery Benefits (freepik )

Jaggery and Til Benefits: हिवाळा सुरु झाला की गूळ खायला हवाच असं मोठे सांगतात. कारण त्यातील पोषक घटक तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. गुळासोबत काही पदार्थांचे सेवन केल्याने फायदे होतात. गुळात लोहाचे प्रमाण जास्त असते. गुळासोबत अनेकदा फुटाणे, तीळ, शेंगदाणे खाल्ले जातात. पण हिवाळ्यात गूळ तीळासोबत खाल्ल्यास चौपट फायदे होतात. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन अवश्य करावे. या दोघांमध्ये आढळणारे पोषक आणि फायदे जाणून घेऊयात...

काय फायदा होतो?

> गूळ आणि तीळ हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

> यामुळे तुमची हाडेही मजबूत होतात.

> हे तुमची त्वचा छान करण्यासही मदत करते.

> गूळ आणि तिळापासून बनवलेले लाडू रोज खाल्ले तर हिवाळ्यात खूप फायदा होतो. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते ज्यामुळे शरीराचे विषाणू होण्यापासून संरक्षण होते.

> हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमची मेटाबॉलिज्म क्रियाही मजबूत होते.

> हे पोटासाठीही खूप उत्तम ठरते.

> अ‍ॅनिमियाच्या रुग्णांनी त्याचा आहारात समावेश करावा.

> हे दोन्ही पदार्थ तुम्हाला तणावापासून दूर ठेवतात. तीळ तुमच्या शरीराला ऍलर्जीपासूनही वाचवते.

> हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

> यामुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

गुळातील पोषक घटक

कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि काही प्रमाणात जस्त आणि तांबे असतात. जीवनसत्त्वांमध्ये फॉलिक अॅसिड आणि बी यांचा समावेश होतो. जटिल जीवनसत्त्वे समाविष्टीत आहे.

तिळातील पोषक घटक

तांबे, मॅंगनीज आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॉलिब्डेनम, व्हिटॅमिन बी १, सेलेनियम आणि आहारातील फायबर यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग