Tricoloured idli and Dhokla: २६ जानेवारी सगळेच उत्सवात प्रजासत्ताक दिन साजरा करतात. प्रत्येकाची सेलिब्रेशनची पद्धत वेगळी असते. काहीजण बाहेर फिरायला जातात तर काहीजण घरी चित्रपट पाहून या दिवसाचा आनंद घेतात. काही जण वेगवगेळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. तर, काहींना हा दिवस या खास रेसिपीने साजरा करायला आवडतो. जर तुम्हालाही ही पद्धत आवडेल असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही तिरंग्याच्या रंगाच्या रेसिपी ट्राय करू शकता. चला तर जाणून घेऊया ट्राय कलरची रेसिपी.
> तिरंगा इडली बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात रवा, मीठ, दही आणि पाणी घालून मिक्स करा.
> नंतर त्यांचे तीन भाग करा.
> याला तिरंगा लूक देण्यासाठी पांढरा, हिरवा आणि केशरी रंग वेगवेगळे मिसळा.
> अर्धा तास हे मिश्रण असेच राहू द्या.
> आता इडली स्टँड घ्या, त्यात पिठात भरा आणि १५ मिनिटे वाफवून घ्या.
> आता तुम्ही हिरवी आणि खोबऱ्याची पांढरी चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करू शकता.
> ढोकळा बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळ वेगळ्या भांड्यात किमान ८ तास भिजत ठेवा.
> पाणी काढून दोन्ही बारीक वाटून घ्या.
> डाळ -तांदळाच्या पेस्टमध्ये आंबट दही आणि थोडे गरम पाणी घालून आंबायला ठेवा.
> आता पिठाचे तीन भाग करा.
> तिन्ही रंगांमध्ये वेगवेगळे रंग मिसळा.
> ६ तासांनंतर, मिश्रणात मीठ आणि किसलेले आले घाला.
> ढोकळ्याचे मिश्रण एका लहान भांड्यात स्टीमरमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे शिजवा. आता तुमचा तीन रंगांचा ढोकळा तयार आहे.
> फोडणीसाठी कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, तीळ, कढीपत्ता घालून एक-दोन मिनिटे शिजू द्या.
> ढोकळ्यावर फोडणी टाका. सर्व्ह करा.
संबंधित बातम्या