Human Rights Day: ९९ टक्के लोकांनां माहितीच नाहीत त्यांचे 'हे' हक्क, यात तुमचा समावेश तर नाही ना?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Human Rights Day: ९९ टक्के लोकांनां माहितीच नाहीत त्यांचे 'हे' हक्क, यात तुमचा समावेश तर नाही ना?

Human Rights Day: ९९ टक्के लोकांनां माहितीच नाहीत त्यांचे 'हे' हक्क, यात तुमचा समावेश तर नाही ना?

Dec 10, 2024 09:56 AM IST

Human Rights In Marathi: भारतात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला आणि १२ ऑक्टोबर १९९३ रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यात आला.

Human Rights Day 2024
Human Rights Day 2024 (freepik)

What Are Human Rights In Marathi:  संयुक्त राष्ट्रसंघाने १० डिसेंबर १९४८ रोजी मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा जारी करून प्रथमच मानवाधिकारांबद्दल माहिती दिली होती. परंतु हा दिवस अधिकृतपणे १९५० मध्ये घोषित करण्यात आला. त्याच वेळी, भारतात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला आणि १२ ऑक्टोबर १९९३ रोजी 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोग' स्थापन करण्यात आला, परंतु १० डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या सनदेला मान्यता दिली नाही. परंतु 10 डिसेंबर हा 'मानवी हक्क दिन' म्हणून निश्चित करण्यात आला.

भारतात १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली, त्यानंतर मानवी हक्क आयोग राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य क्षेत्रातही काम करतो. जसे वेतन, एचआयव्ही एड्स, आरोग्य, बालविवाह, महिलांचे हक्क. अधिकाधिक लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हे मानवी हक्क आयोगाचे काम आहे. मात्र, भारतातील मानवी हक्कांबाबत बोलायचे झाले तर आजही अनेकांना मानवाधिकार हे स्वतःचे हक्क असूनही त्याची जाणीव नसल्याचे स्पष्ट होते. मागासलेली राज्ये आणि साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन सामान्य आहे. अशा भागात सत्ता असलेले लोक हे नियम पाळत नाहीत आणि सर्वसामान्यांवर दबाव टाकतात. शहरांतील लोकांना मानवी हक्कांची जाणीव असते पण ते त्यांचा चुकीचा फायदाही घेतात. त्यामुळेच आज आपण पाच सर्वसामान्य मानवी हक्क जाणून घेऊया...

कलम १-

प्रत्येक व्यक्ती जन्मताच स्वतंत्र आहे. आणि प्रत्येकालाच समान न्याय, मानसन्मान, प्रतिष्ठा आणि समान अधिकार आहेत.

कलम २-

मानवाधिकार जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व हक्क आणि अधिकार प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, रंग, लिंग यांचा भेदभाव न करता देण्यात यावेत. जर कोणताही भेदभाव झाल्यास तो कायदेशीर गुन्हा असेल.

कलम ३-

प्रत्येकालच हवे तिथे आणि हवे तसे जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. परंतु असे करताना इतर व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बाधा येता कामा नये.

कलम ४-

कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीला गुलामगिरीत ठेवणे किंवा गुलामाची वागणूक देणे गुन्हा समजला जातो. या प्रथा कायदेशीररित्या बंद करण्यात आल्या आहेत.

कलम ५-

कोणत्याही व्यक्तीचा जाणून बुजून अपमान करता कामा नये. किंवा कोणालाही क्रूर आणि हिंसक वागणूक देता कामा नये.

Whats_app_banner