Happy Hug Day 2025 In Marathi : व्हेलेंटाईन वीक सुरू आहे आणि व्हेलेंटाईन वीक मधील सहावा दिवस म्हणजेच ‘हग डे’ होय. हग डे म्हणजे मिठी मारणे, मिठी मारल्याने प्रेमासोबतच जवळीक देखील वाढते. प्रेम वाढवण्यासाठीच नाही तर अनेक आजार व समस्या दूर करण्यासाठी देखील मिठी मारणे लाभदायी समजले जाते.
हग डे च्या दिवशी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना प्रेमाची व मायेची मिठी मारली जाते. या दिवशी आपण एखाद्या व्यक्तीवर किती प्रेम करतो, त्याच्याविषयी आपल्याला किती आदर आहे, त्याचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे घट्ट मिठी मारून दाखवण्याची संधी असते. हा दिवस फक्त प्रेमीयुगुलांसाठीच खास नाही. तर या दिवशी आपण कुटुंबातील व्यक्ती, मित्रमैत्रीणी, आयुष्यातील खूप महत्त्वाची लोकं यांना मिठी मारून स्पेशल फिल करू शकता. या हग डे च्या निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तिंना मिठीसोबत या खास शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस आणखी आनंदमय करा.
काळाच्या ओघात कळलेच नाही
आयुष्य कसे कुठे बदलले
तू भेटलीस आणि पुन्हा जगावेसे वाटले
हॅपी हग डे
…
माझ्या प्रत्येक मिठीने तुला सांत्वन मिळो आणि
माझे हात तुझे आश्रयस्थान असोत.
मिठी दिनाच्या शुभेच्छा
…
तुझे स्पर्श मला,
विश्वासाची उब मिळवून देते,
तू माझ्या सोबत असताना,
जग स्वर्गासारखं वाटते
हॅपी हग डे
…
जोडीदार म्हणजे एक प्रवासातला सोबती
एकमेकांच्या आत्म्याचं प्रेमाने केलेलं मिलन
ज्याच्या साधीने प्रत्येक वळण होते आनंददायी
हग डे च्या हार्दिक शुभेच्छा
…
जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ
तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे
तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे.
हग डे च्या खूप खूप खूप शुभेच्छा
…
एक स्वप्न, तुझ्यासोबत जगण्याचं
एक स्वप्न, तुझ्यामागे माझं नाव लावण्याचं
Happy Hug Day
…
आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा,
मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा
हग डे च्या शुभेच्छा
…
कधी मला जवळ घेऊन बघ,
माझ्या हृदयाचे ठोके ऐक,
प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.
हॅपी हग डे
…
तुझ्या मिठीत, मला माझे घर सापडले आहे.
जेव्हा तू मला मिठी मारतोस किंवा मारतेस
तेव्हा माझ्या चिंता नाहीशा होतात.
मिठी दिनाच्या शुभेच्छा
संबंधित बातम्या