How It Can Impact Your Body : आनंदी वाटत आहे का? चला मिठी मारूया! दुःखी वाटतंय? चला मिठी मारूया! एक जादूची झप्पी ही सर्वात पॉवरपॅक्ड औषध आहे, जे आपल्याला झटक्यात तणाव मुक्त करू शकते आणि आपल्याला लगेचच आनंदी मूडमध्ये आणू शकते. आपल्या जोडीदाराने आपल्याला मारलेली घट्ट, आरामदायक मिठी असो किंवा हलकासा साईड हग असो, प्रत्येक मिठीमध्ये आपल्याला मनातून आनंदी करण्याची क्षमता असते.
आरजेएन अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. आभास कुमार सांगतात, 'जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा आपला मेंदू ऑक्सिटोसिन (ज्याला लव्ह हार्मोन देखील म्हणतात) आणि डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखी 'फील-गुड' रसायने सोडतो. हे हार्मोन्स आपल्यात आनंद आणि विश्वासाची भावना निर्माण करतात. त्वचेत खास सेन्सर असतात, जे मेंदूला सांगतात की आपण सुरक्षित आहोत.'
अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की जे लोक जास्त मिठी मारतात त्यांना उदास किंवा नैराश्य येण्याची शक्यता कमी असते. डॉ. कुमार यांच्या मते, मिठी मारल्याने रक्तदाब कमी होतो, स्नायूंना आराम मिळतो, वेदना कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. जया सुकुल म्हणतात, ‘शारीरिक स्पर्श आवश्यक आहे, परंतु हे ओळखणे महत्वाचे आहे की, काही लोक मिठी मारण्यात आरामदायक नसतात, विशेषत: ज्यांना त्यांच्या बालपणात शारीरिक आपुलकीचा अनुभव आलेला नसतो.’ असे असूनही, त्या पुढे म्हणतात की, ‘मिठी हा रोमँटिक आणि नॉन-रोमँटिक दोन्ही बंध जोपासण्याचा हा सर्वात जिव्हाळ्याचा मार्ग आहे.’
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, न्यूझीलंडमधील ड्युनेडिन विमानतळाने विमानतळाच्या ड्रॉप-ऑफ झोनमध्ये तीन मिनिटांपर्यंत मिठी मारण्याची मर्यादा घातल्याने हे ठिकाण चांगलेच चर्चेत आले होते. दुसरीकडे, लंडनमधील हिथ्रो विमानतळावरील एक होर्डिंग व्हायरल झाले ज्यात लिहिले होते, ‘मिठी मारण्यासाठी हवा तितका वेळ... कोणतीही मर्यादा नाही! प्रेमळ निरोपांना प्रोत्साहन दिले जावे.’
ब्रिस्टल युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार एक, पाच आणि दहा सेकंद अशा वेगवेगळ्या कालावधीच्या मिठीचा आनंद आणि मेंदू नियंत्रणाच्या दृष्टीने किती फायदा होतो, जे जाऊन घेतले. याच्या परिणामांमध्ये असे दिसून आले आहे की, एक सेकंदाची मिठी सातत्याने सर्वात कमी आनंददायक मानली गेली.
संबंधित बातम्या