Hug Day 2025 : प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! 'हग डे'च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hug Day 2025 : प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! 'हग डे'च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या!

Hug Day 2025 : प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! 'हग डे'च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या!

Published Feb 11, 2025 03:09 PM IST

Types Of Hugs : व्हॅलेंटाईन वीकमध्ये दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी 'हग डे' अर्थात मिठी दिवस साजरा केला जातो. 'हग डे'च्या दिवशी केवळ आपल्या जोडीदारांनाच नाही तर आपल्या मित्रांनाही प्रेमाने मिठी मारली जाते.

प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! 'हग डे'च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या
प्रत्येक मिठीचा अर्थ असतो वेगळा! 'हग डे'च्या दिवशी मिठी मारण्याआधीच जाणून घ्या

Hug Day Special Hugs Meanings : व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजे 'हग डे' अर्थात मिठी दिवस. या दिवशी लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तींना, त्यांच्या हृदयाच्या जवळच्या लोकांना आणि त्यांच्या जोडीदारांना प्रेमाने आलिंगन देतात. असे म्हणतात की, मिठी मारल्याने हृदयाला खूप शांती मिळते. मिठी हा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा हा एक चांगला मार्ग देखील आहे. मिठी फक्त शारीरिक स्पर्श नाही, तर भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ जाण्याची कृती आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, मिठी मारण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रत्येक मिठीचा अर्थ देखील वेगळा आहे. मिठी सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. मिठीचे प्रकार आणि त्यांचे अर्थ जाणून घेऊया...

मिठी मारण्याचे प्रकार आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ

साइड हग

साइड हग म्हणजेच बाजूने मारलेली मिठी ही अशा लोकांसाठी असते, ज्यांना तुम्ही ओळखता पण त्यांच्याशी तुमचे फारसे जवळचे संबंध नाहीत. या मिठीला सभ्य आणि मैत्रीपूर्ण म्हणतात. जवळचे मित्र आणि रोमँटिक जोडीदाराला कधी कधी सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी या प्रकारची मिठी मारू शकतात.

वेस्ट हग

कमरेवर हात ठेवून मारलेल्या मिठीला 'वेस्ट हग' म्हणतात. या मिठीला रोमँटिक मिठीही म्हणतात. अशा प्रकारे मिठी मारण्याचा अर्थ असा की, ती व्यक्ती तुमच्यासोबत जास्त वेळ घालवू इच्छिते आणि तुमचे या व्यक्तीशी खूप जवळचे नाते आहे.

Valentines Day 2025 सुरू होतोय प्रेमी युगुलांचा 'व्हॅलेंटाईन वीक' आताच नोट करून ठेवा तारखा आणि दिवस

बॅक हग

मागून मिठी मारणे किंवा बॅक हग देणे म्हणजे मी नेहमीच तुझ्यासोबत आहे असे एखाद्या व्यक्तीला सांगणे. याला सगळ्यात विश्वासू मिठी असेही म्हटले जाते. जोडीदार अशा प्रकारे एकमेकांना मिठी मारतात आणि म्हणण्याचा प्रयत्न करतात की, मी नेहमी तुझी काळजी घेईन.

टाइट हग

टाइट हग म्हणजेच घट्ट मिठी ज्यांना तुम्ही खूप प्रेम करता आणि ज्यांच्यापासून दूर जाण्यास घाबरता त्यांनाच घट्ट मिठी मारली जाते. ही मिठी दोन व्यक्तींमधील जवळीक दर्शवते. या मिठीत असे वाटते की जणू तुम्ही दोघेही एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकू शकता.

बडी हग

तुम्ही तुमच्या मित्रांना दिलेल्या मिठीला 'बडी हग' म्हणता येईल. यामध्ये, दोन लोक एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांच्या खांद्यावर हाताने थाप देतात. या प्रकारची मिठी धैर्य वाढवण्यासाठी देखील दिली जाते.

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner