How to Style Kurti in Winter: रेग्युलर वापरासाठी कुर्ता हे मुलींचे आवडते पोशाख आहे. कुर्ता सर्वात कंफर्ट वियरमध्ये गणला जातो. पण हिवाळ्यात कुर्ता स्टाइल करणं सगळ्यात अवघड वाटतं. त्यामुळे ते घालायला मुलींना कमी आवडते. डेली वियरमध्येही मुली कुर्त्याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला कुर्ता घालायला आवडत असेल पण हिवाळ्यात ते कसे स्टाईल करावे हे माहीत नसेल तर या टिप्स फॉलो करा. तुम्हाला कुर्त्यामध्येही स्टायलिश लुक मिळेल.
जर तुम्हाला वाटत असेल की बूट किंवा हील्स असलेले लोफर्स फक्त जीन्ससोबत स्टायलिश दिसतात तर एकदा तुमच्या वुलेन कुर्तासोबत बूट पेअर करा. किंवा हील्सवाले लोफर्स घाला. यामुळे तुमच्या पायांचे थंडीपासून संरक्षण होईल आणि तुमचा संपूर्ण लुक स्टायलिश दिसेल.
हिवाळ्यात कुर्त्या सोबत शॉर्ट लेंथ स्वेटर किंवा जॅकेट चुकूनही पेअर करू नका. शॉर्ट लेंथ स्वेटर किंवा जॅकेट कुर्त्यासोबत परफेक्ट मॅच होत नाही. त्यामुळे तुमचा लुक फारसा चांगला दिसत नाही.
तुम्ही वुलेन कुर्ता घातला असाल तर हेवी शाल कॅरी करा. हे एलिगंट आणि सुंदर लुक देते. तुम्हाला हवे असल्यास थंडीपासून बचाव करण्यासाठी वुलेन इनरवियर कॅरी करू शकता. तसेच शाल तुमचा लुक कंप्लीट करेल. हे देखील लक्षात ठेवा की सोबत हील्स असलेले फुटवेअर पेअर करे. तरच तुम्हाला सुंदर लुक मिळेल.
हिवाळ्यात कुर्त्या सोबत लेअरिंग करायचे असेल तर गुडघ्यापर्यंत लांब जॅकेट किंवा स्वेटर घाला. जेणेकरून कुर्त्याचा लूक परफेक्ट दिसतो. तसं तर अनारकली, एस्मेट्रिक डिझाईनच्या कुर्त्यासोबत हे जॅकेट फारसे चांगले दिसत नाही. फक्त स्ट्रेट फिट कुर्त्यासोबतच लाँग स्वेटर किंवा जॅकेट परफेक्ट दिसतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या