Tips to Wear Boots with Dress: हिवाळा येताच मुलींचे बूट बाहेर येतात. तसं तर मुली बूट्स घालून गॉर्जियस दिसतात. बूट हे स्टायलिश दिसत असले तरी त्यात अनेक प्रकार आहेत. जर तुम्ही जीन्सऐवजी ड्रेससोबत बूट घालणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तरच ड्रेस आणि बूट यांचे कॉम्बिनेशन परफेक्ट दिसेल. जाणून घ्या ड्रेससोबत बूट घालताना कोणत्या स्टाईलिंग टिप्स फॉलो करावे.
जर तुम्ही लाँग लेंथ किंवा मिडी ड्रेससोबत बूट घालणार असाल तर कंबरेला बेल्ट घालायला विसरू नका. यामुळे तुमचा लुक परफेक्ट आणि स्टायलिश होण्यास मदत होईल. बेल्ट घातल्याने वेस्ट लाइन हायलाइट होईल आणि बूटसोबत त्याचे कॉम्बिनेशन परफेक्ट दिसते. लाँग लेंथ किंवा मिडी ड्रेससोबत नेहमी थोडेसे हील असलेले बूट निवडा.
जर तुम्हाला थाय हाय किंवा लाँग मिड काल्फ लेंथ बूट्स घालायला आवडत असेल तर अशा लाँग बूट्ससोबत नेहमी शॉर्ट ड्रेस घाला. जे बुटांच्या सुमारे ६ इंच वर असेल. तरच तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.
जर तुम्हाला सिंपल हील नसलेले एंकल लेंथ बूट्स तुमच्या ड्रेससोबत स्टायलिश पद्धतीने कॅरी करायचे असेल तर त्यासोबत मोजे घाला. सॉक्सची हेमलाइन बुट्स सोबत सॉफ्ट लुक देईल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
जर तुम्ही हेवी बूट कॅरी करत असाल तर त्याच्यासोबत मॅचिंग बेल्ट घालायला विसरू नका. हे हेवी बूटांसह तुमचा लूक संतुलित करण्यात मदत करेल.
जर तुमच्याकडे एंकल लेंथ बूट्स असतील तर ते ड्रेससोबत टाइट्स घालून कॅरी करा. यामुळे बूट्ससोबत ड्रेसचा कॉम्बिनेशन परफेक्ट दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या