Silk Saree Wash At Home: साड्या म्हणजे बायकांचा जीव की प्राण. मुलगी असो किंवा महिला सगळ्यांसाठीच साडी हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. वेगवगेळ्या साड्यांची वेगेवगेळी काळजी घ्यावी लागते. सिल्कच्या साड्या महाग असतात आणि फारच नाजूकही असतात. याच कारणांमुळे लोक घरी सिल्कच्या साड्या धुणे टाळतात. चुकीच्या पद्धतीने साडी धुतल्याने या साड्यांची चमक आणि रंग खराब होण्याची भीती असते. यामुळेच अनेकदा या सिल्कच्या साड्या ड्राय क्लीन करून घेतात.- पण तुम्ही सिल्कच्या साड्या घरीही धुवू शकता यासाठी तुम्हाला फक्त काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. चला जाणून घेऊयात या टिप्स..
सिल्कच्या साड्या धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एक बादली पूर्ण पाण्याने भरा आणि २ चमचे व्हिनेगर मिसळा. यात साडी १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर बाहेर काढून सध्या पाण्याने धुवा.
जेव्हाही तुम्ही सिल्कची साडी धुणार असाल तेव्हा त्याचसोबत दुसरे कोणतेही कपडे एकत्र धुवायला घेऊ नकात. यामुळे साडीला हवं तेवढंच डिटर्जंट वापरले जाते.
सिल्कची साडी नाजूक असते त्यामुलर या साड्या धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका. सिल्कच कापड नेहमी थंड पाण्याने हाताने धुवा. साडी धुण्यापूर्वी अर्धा तास बादलीत भिजत ठेवा. आता मगच पुढील वॉशिंग प्रक्रिया सुरू करा.
साडी धुतल्यानंतर तीला तशीच बराच वेळ ठेवू नकात. लगेच कोरडे करा. पण त्यानंतर साडीला थेट सूर्यप्रकाशात कोरडे करण्यासाठी ठेवू नये. साडी घरामध्ये, बाल्कनीत किंवा सावलीच्या ठिकाणी वाळवा. जर तुम्ही ते बाल्कनीमध्ये कोरडे करत असाल तर ते टॉवेलने झाकून ठेवा. कडक सूर्यप्रकाशात साडीचा रंग फिका पडू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)