How to keep jeans from fading: जीन्स किती वेळा धुवावी? जीन्स कशी धुवावी? असे अनेक प्रश्न नेहमी अनेकांना पडतो. याच उत्तर अनेकांना आजही माहित नसते. अनेकजण इतर कपड्यांप्रमाणे जीन्स सतत धुत राहतात, त्यामुळे ते लवकर खराब होतात आणि जीन्सचा रंग फिका पडू लागतो. अशा स्थितीत जीन्स धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेतले पाहिजे. जीन्स गरम पाण्याने धुवावी की थंड पाण्याने हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग, जीन्सबद्दलच्या या सर्व गोष्टी सविस्तरपणे जाणून घेऊया.
जीन्स दोन आठवड्यातून एकदाच धुवावी. जर तुम्ही काही दिवसांतच जीन्स धुत असाल तर जीन्सचा रंग उतरू लागतो. सारखी जीन्स धुतल्याने जीन्स फिकटही पडू शकते. पोतही खराब होऊ शकतो.
जीन्स धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा. लक्षात ठेवा जीन्स कधीही गरम पाण्याने धुवू नका. यामुळे जीन्सचा रंग खराब होतो. याशिवाय जीन्स कितीही रफटफ असली तरी जीन्स धुताना मात्र अतिशय मऊ डिटर्जंट वापरावं. कोणतेही हार्ड डिटर्जंट वापरल्याने तुमची जीन्स पूर्णपणे खराब होऊ शकते.
जीन्स धुताना त्यात व्हिनेगर घाला. असे केल्याने जीन्स सहज धुण्यास मदत होते. याशिवाय, व्हिनेगर जीन्सचा रंग ठीक करण्यास मदत करते. जीन्स व्हिनेगर पाण्यात १ तास भिजवा. असे केल्याने जीन्सचा रंग ठीक होण्यास मदत होते. त्यामुळे जीन्स धुताना या गोष्टी लक्षात ठेवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या