Morning Walk: असं म्हंटल जाते की रोज १० हजार पावले चालली पाहिजेत. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहते. यामुळे अनेक आजार टाळले जातात. मधुमेह आणि हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांनी तर आवर्जून मॉर्निंग वॉक ला त्यांच्या दैनंदिन रुटीनचा एक भाग नक्कीच बनवावा. कारण जर तुम्ही सकाळी फिरायला गेलात तर तुमचे हृदय आणि मेंदू निरोगी राहतील. याशिवाय तुम्हाला मधुमेह असेल तर मॉर्निंग वॉक केल्यास तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहील. जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी तर रोज मॉर्निंग वॉकी करणे फारच गरजेचे आहे. पण वजन कमी करण्यासाठी चालण्याच्या पद्धतीत थोडा बदल करायला हवा. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
> चालण्यासाठी चांगले स्पोर्ट्स शूज घालणे आवश्यक आहे. कधीही वॉक करायला जाताना चप्पल किंवा हाय हिल्स घालू नका. आरामदायी वॉक करण्यासाठी किंवा धावण्यासाठी शूज घालावेत.
> चालण्याआधी थोडे वॉर्म अप करा. यामुळे शरीर सक्रिय होते.
> चालताना पाणी पिण्यास विसरू नका. चालताना घसा कोरडा होतो. त्यामुळे मध्ये मध्ये १-२ घोट पाणी पिऊन तुमचे शरीर हायड्रेट ठेवा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
> जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा फार वेगाने पावले टाकू नका. छोटी पावले टाका. वेगाने चालत असाल किंवा धावत असाल तर तुम्हाला थकवा येईल आणि पाय दुखू शकतील. चालताना पुढे झुकणे टाळा. चालताना पुढे पहा.
> रोज एका ठिकाणी चालण्याचा कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे जागा बदलत राहा. संगीतासह चालल्याने तुम्हाला कंटाळा कमी होईल. चालताना हात हलवायला विसरू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)