मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Surajkund Mela 2024: या ठिकाणी होतोय जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा! जाणून घ्या डिटेल्स

Surajkund Mela 2024: या ठिकाणी होतोय जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा! जाणून घ्या डिटेल्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 31, 2024 12:42 PM IST

Surajkund fair in Faridabad: सूरजकुंड मेळा हा जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जाणून घ्या कुठे, कधी आणि कसे पोहोचायचे या मेळाव्यासाठी…

Surajkund International Crafts Mela
Surajkund International Crafts Mela (Sanjeev Verma/HT PHOTO)

Surajkund Mela 2024: एक अनोखा आंतरराष्ट्रीय हस्तकला महोत्सव (International Crafts Fair) म्हणजे सूरजकुंड मेळा. हा जगभरातील कलाकारांसाठी त्यांची संस्कृती त्यांचं आर्ट प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ देते. हा एक मोठा हस्तकला मेळा असतो. हरियाणा पर्यटन (travel tips)  विभागातर्फे दरवर्षी सूरजकुंडमध्ये हा मेळा आयोजित केला जातो. हा मेळा सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे. हा मेळा यशस्वी करण्यासाठी दक्षिण आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील २० हून अधिक देश सक्रियपणे सहभागी होतात. यावर्षी सूरजकुंड मेळा २०२४ ची थीम राज्य गुजरात आहे. तुम्हाला प्रत्येक राज्यातील वस्तू आणि कलाकृती पाहायच्या असतील तर तुम्हाला या मेळाव्याला भेट देणे गरजेचे आहे. मिळतील. चला इथे कसे आणि कधी पोहोचायचे ते जाणून घेऊयात.

कधी सुरु होणार मेळा?

२ फेब्रुवारीपासून सूरजकुंड मेळा सुरू होत असून १८ फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा मेळा भरणार आहे. या जत्रेत जाण्यासाठी तुम्हाला १८० रुपयांचा तिकीट काढावे लागेल, तर वीकेंडला २०० रुपये मोजावे लागतील.

Events in Goa: फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये गोव्याला जाताय? आवर्जून या इव्हेंट्सला लावा हजेरी!

तिकीट कुठे मिळणार?

सुरजकुंड मेळ्यासाठी तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक मिळवू शकता. याशिवाय तुम्ही तिथे जाऊनही तिकीट खरेदी करू शकता.

National Tourism Day: भारतातील या ४ ठिकाणांना परदेशी पाहुण्यांची आहे पसंती, तुम्हीही आवर्जून द्या भेट!

कसं जायचं मेळ्यात?

सुरजकुंड मेळ्यात जाण्यासाठी, तुम्हाला फरीदाबादला पोहोचावे लागेल. तिकडून तुम्हाला सूरजकुंड जाण्यासाठी मिनी बस मिळतील. तिथून दर अर्ध्या तासाने एक बस सूरजकुंडला जाते. याशिवाय स्वत:च्या गाडीने जायचं असल्यास तिकडे पार्किंगसाठी ११ ठिकाणे आहेत. या मेळ्यात जत्रेत तुम्ही खाद्यपदार्थ, संगीत, नृत्य, मोठं मोठ्या राइड्स, कपडे आणि विशिष्ट राज्य आणि देशाशी संबंधित सुंदर वस्तू खरेदी करू शकता.

IRCTC Tour Package: स्वस्तात परदेश प्रवास करायचा आहे? IRCTC घेऊन आले आहे सुवर्णसंधी!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel