मराठी बातम्या  /  Lifestyle  /  How To Use Vitamin E Capsules To Get Rid Of Hair Fall

Hair Fall Remedy: गळणाऱ्या केसांवर असे वापरा व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, होतील अनेक फायदे

हेअर फॉल कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सुल
हेअर फॉल कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सुल (pexels)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Sep 18, 2023 06:35 PM IST

Hair Care With Vitamin E Capsule: व्हिटॅमिन ई केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. जाणून घ्या ते कसे वापरायचे.

Tips To Use Vitamin E Capsule For Hair Fall: त्वचेसोबतच व्हिटॅमिन ई केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. याचा वापर त्वचा चमकदार बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. यात अनेक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. केस गळण्याची समस्या असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता. याच्या एका वापराने तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. जर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन ईचा समावेश केला तर ते देखील फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हे केसांवर वापरायचे असेल तर ते कसे वापरायचे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

केसांवर व्हिटॅमिन ई कसे वापरावे?

व्हिटॅमिन ई केसांसाठी खूप फायदेशीर आहे. गळणाऱ्या केसांवर याचा वापर करायचा असेल तर कोणत्याही तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. यानंतर केसांच्या मुळांपर्यंत ते नीट लावा. ते अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या डोक्याला चांगला मसाज करा आणि नंतर आपले केस कंगव्याने विंचरा. मसाज केल्यानंतर केसांवर तेल कमीत कमी २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर तुम्ही ते शॅम्पूने धुवू शकता.

हेअर मास्क बनवा

या हेअर मास्कसाठी तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल, खोबरेल तेल आणि एरंडेल तेल लागेल. यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये २ चमचे खोबरेल आणि एरंडेल तेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा. तासभर तसंच राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग